मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासनाच्या नवीन रेती धोरणानुसार सर्वसामान्य नागरीकांना स्वस्त दरात रेती मिळावी या करीता हिंगणघाट तालुक्यात सावंगी रीठ, येळी व चिंचोली या ३ ठिकाणी रेती डेपो तयार केले असून त्यापैकी सावंगी व येळी येथील रेतीडेपोचे उद्घाटन नरेंद्र फुलझेले अपर जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, नायब तहसिलदार विजय पवार, समशेर पठाण आजनसराचे सरपंच काचोळे, टाकळीचे सरपंच आशीष राऊत व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील नागरीकांना स्वस्त दरात रेती उपलब्ध करण्यात येणार आहे. 672 रुपयामध्ये एक ब्रास रेती मिळणार आहे. वाहतुकीचा खर्च नागरीकांना स्वता करावा लागणार आहे. याकरीता नागरीकांना mahakhanij. Maharashtra. Gov.in या महाखनिज पोर्टल वर जावून ऑनलाईन नोंदणी करून रेती उपलब्ध होईल. मोबाईल वरून ही नोंदणी करता येईल. तसेच सेतू केंद्रातून ही नोंदणी करता येईल. ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही त्यांनी रेतीसाठ्याच्या ठिकाणी आधार कार्ड घेवून जावे, तिथे लॅपटॅाप व संगणक इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. रेतीडेपोच्या ठिकाणी ॲापरेटर नोंदणी करून देईल. नागरीक आपल्या जवळच्या डेपोतून रेती घेवू शकतात. तसेच घरकूल योजनेचे लाभार्थ्यांना मोफत रेती मिळणार आहे. फक्त वाहतूकीचा खर्च स्वता करावा लागेल. तसेच सिंचन विहीराकरीता मोफत रेती मीळणार आहे. आज १५ घरकूल लाभार्थ्यांना मोफत रेती देवून उद्घाटन करण्यात आले आहे. स्वस्त दरात रेती मिळाल्यामुळे चोरीला आळा बसेल व रेतीचोरी होवू नये या करीता तहसिल कार्यालयाकडून पथक तयार करण्यात आले आहेत. नागरीकांनी आवाहन करण्यात येते की रेतीचोराकडून विनापरवाना रेती घेवू नये. डेपोमधून कमी दरात रेती घ्यावी.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा. 9766445348 / 7385445348

