लेखिका : प्राचार्य अस्मिता दारुंडे (भगत) ज्ञान संवर्धन अध्यापक विद्यालय हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिनविशेष रमाई भिमराव आंबेडकर स्मृतीदिन:- रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. रमाईच्या संघर्षातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित होऊ शकले. आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांना अनेक प्रसंगाला पुढे जावे लागले. लहानवयातच भावा बहिणीची जबाबदारी त्यांच्यावर होती. लग्न झाल्यावर बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी संसाराचा संपूर्ण गाढा रमाबाईंनी जिद्दीने व दुःखातून, अडी- अडचणीतून मार्ग काढीत यशस्वीपणे चालविला. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात हाल-अपेष्टा, दुःख, दारिद्र्य पाहिले. लहानपणीच आई – वडिलांचे छत्र हरवलेली रमाई. लग्न झाल्यावर वडीलांसमान सासरे सुभेदार रामजी यांचा देखील मृत्यू झाला. कमी आयुष्यात खूप यातना त्यांनी सहन केल्या. रमाबाई यांच्या जीवनात सर्वात मोठे दुःखद घटना घडली ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा बाळ गंगाधर व राजरत्न यांचा मृत्यू झाला. एवढे सर्व घडत असताना देखील याबद्दल बाबासाहेबांना काहीच कधीच सांगितले नाही, याची चाहूल देखील कधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होऊ दिली नाही.
आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना शेणगोव-या थापाव्या लागत. जीवनात अतिशय हालअपेष्टा त्यांनी सहन केल्या होत्या, रमाबाई कर्तव्यदक्ष स्त्री होत्या, त्यांना दुसऱ्याचे होणारे हाल कधीच पाहविले जात नव्हते, स्वतः हाल-अपेष्टा सहन करीत जगल्या, पण दुसऱ्यांना मदत करण्याच त्यांनी कधीच सोडलं नाही. असा एक प्रसंग… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले होते तेव्हा रमाबाई एकट्या पडतील म्हणून त्यांनी आपल्या मित्राकडे पाठविले,’ वराळे’ असे मित्राची नाव होते. वराळे यांचे स्वतःचे वस्तीगृह होते, तिथे मुले खेळायला यायची, पण दोन – चार दिवसांपासून मुले खेळायला आली नाही, ही खंत रमाबाईला मनातल्या मनात वाटत होती, त्यांनी वराळे काकांना विचारलं तेव्हा ते म्हणाले वस्तीगृहात मुलांच्या जेवणांच सामान अजून आलं नाही आणि ते सामान यायला जवळपास तीन चार दिवस लागतील तोपर्यंत ही मुलं उपाशी राहतील. त्या वेळी रमाई यांच्यातील एका आईचं हृदय पाणावले, त्या स्वतः च्या डोळ्यातील अश्रू पुसत आपल्या खोलीत गेल्या, आणि आपल्या कपाटातून त्यांनी आपल्या जवळ असलेली सोनं काढलं आणि ते काकांना दिलं त्या म्हणाल्या की हे सगळं गहाण ठेवा नाहीतर विका, यातून जे पैसे मिळतील त्यातून जेवणाचं सामान आणा आणि मुलांना जेवायला द्या. एवढं अंथाग व्यक्तिमत्व व त्यांचे संपूर्ण जीवन आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरतं. म्हणूनच रमाईच्या महान त्यागामुळे त्यांच्या कष्टामुळे त्या त्यागमुर्ती ठरल्या व म्हणूनच…. माझ्या आईपेक्षाही असंख्य तुझे उपकार आहे, कारण आईने जन्म दिला, पण मला माझं अस्तित्व, जगण्याचा उद्देश आणि लढण्याचं बळ, मात्र माझ्या आई रमाईने दिला, त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा. प्रशांत जगताप संपादक महाराष्ट्र संदेश न्युज 9766445348 – 7385445348

