पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून अचानक चाहन चेकिंग करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार पो. हवा. २८३ अमोल हिरवे. पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो. शि. १००२६ राहुल थोरात, पो. शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि.८६४६ जयदेव भोसले, पो.शि.८४४२ गणेश चिंचकर, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो. शि. १००१७५ राहुल रासगे, पो शि १००१८ नितेश शेलार, पो.ना. ६९४६ राहुल वंजारी असे गुप्त बातमीदारामार्फतीने, रहदारीच्या ठिकाणी अचानक वाहन चेकिंग करुन तसेच वयाने कमी असणारे जी मुले गाडी चालवत आहे, त्यांना तपासुन वाहने चेक करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना दि. १८/०५/२०२३ रोजी आरोपी नामे संग्राम काशिनाथ कसबेकर, द ३८ वर्षे, रा.ग न ११, सोमनाथ कामठे यांच्याकडे भाडयाने, लक्ष्मीनगर, कोंढवा बुझा पुणे याच्याकडे एच एफ डिलक्स क्र. एम. एच. १२. जी. एल. ७४८४ ही मोटार सायकल मिळुन आली होती. सदर मोटार सायकल वरिल नंबर हा हाताने टाकलेला होता तसेच नंबरबाबत पोलीस अंग गणेश चिंचकर, राहुल रासगे, अमोल हिरवे सशय वाटत असल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन खात्री करता सदर मोटार सायकल त्याने डेक्कन टॉवर समोर, कॅम्प पुणे येथुन चोरी केल्याची कबुली दिली. सदर मोटार सायकलबाबत लष्कर
पोलीस ठाणे गुरन ४१ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच दि. १७/०५/२०२३ रोजी शिवनेरी भागात पेट्रोलिंग करत असताना संशयीत रित्या विधी संघर्षग्रस्त बालक हा डिओ मोटार सायकल एम.एच.१२ एफ.एच.३४६७ ही घेवून जात असताना पोलीस अंम विकास मरगळे व जयदेव भोसले यांना दिसला. सदर मो.सा. बाबत त्याच्याकडे तपास करता त्याने सदर मो.सा. ही शिवनेरीनगर गल्ली नं. २० येथुन चोरी केल्याचे सांगितले त्याने अधिक मो.सा. चोरी केल्या असल्याबाबत संशय वाटत असल्याने त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने भाग्योदयनगर गल्ली नं.०४ अँटिव्हा टू व्हिलर मोटार सायकल एम.एच.१३. बी. एम. ६६६५ ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. वरिल दोन्ही मोटार सायकल बाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन ४६३ / २०२३ भादवि कलम ३७९ व गुरन ४४६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असणारे गुन्हे उघड झाले आहे. तसेच दि.२२/०५/२०२३ रोजी भाग्योदयनगर भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंम. सुहास मोरे व राहुल थोरात संशयीत रित्या विधीसंघर्षग्रस्त बालक याच्याकडे युनिकॉन मोटार सायकल एम.एच.१२ आर.डी. ७२५५ ही मो सा मिळुन आली होती. सदर मो.सा. बाबत त्याच्याकडे तपास करता त्याने सदर मो.सा. ही मिठानगर, कोंढवा येथुन चोरी केल्याचे सांगितले. वरिल मोटार सायकलबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन.४८१ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असणारे गुन्हे उघड झाले आहे. वरिल १ आरोपी व २ विधसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडुन एकुण ४ चोरीच्या मोटार सायकल एकुण १ लाख रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आलेल्या आहे. उघड झालेले गुन्हे पुढीलप्रमाणे
१) लष्कर पोलीस ठाणे गुरन ४१ / २०२३ भादवि कलम ३७९
२) कोंढवा ठाणे गुरन ४६३ / २०२३ भादवि कलम ३७९
३) कोंढवा पोलीस ठाणे गुरन ४४६ / २०२३ गादवि कलम ३७९
४) कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन ४८१ / २०२३ भादवि कलम ३७९
वरिलप्रमाणे कारवाई मा. रितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, मा. संदिप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त सो, मा. रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त पूर्वे प्रादेशिक विभाग, मा. विक्रम देशमुख, पोलीस उप आयुक्त परि०५ मा श्रीमती पौर्णिमा तावरे सो सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली आहे…

