पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:– येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून राहत्या घरी धारधार चाकूने गळा चिरून तिचा निर्घृण हत्या केली ही घटना कोंढव्यातील पिसोळी भागात घडली आहे. या घटनेनंतर पती पसार झाला असून याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरती रणजीत झा वय 26 वर्ष, रा. पद्मावती मंदिराजवळ, पिसोळी, कोंढवा,पुणे असे पती कडून हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा वय 36 वर्ष याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आरती झा हिचे काका राजेश रामकृपाल झा वय 37 वर्ष यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.पसार झालेला आरोपी रणजीत झा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो मोटारीवर चालक म्हणून काम करत आहे. तर आरती झा एका सराफी पेढेत कर्मचारी आहे.
सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झालेला आहे. एक महिन्यांपूर्वी ते पिसोळी परिसरात राहण्यास आले आहे. रणजीत आरतीच्या चारित्र्याचा वेळोवेळी संशय घेत होता. साेमवारी (२९ मे) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रणजीत आणि आरतीत कौटुंबिक कारणातून वाद झाला. आरतीचे काका राजेश झा आणि त्यांच्या पत्नीने घरी जाऊन संबंधित वाद मिटवला होता. मात्र, मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या आरतीचा गळा रणजीतने धारदार चाकूने चिरला.
गंभीर जखमी अवस्थेतील आरतीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, उपचारांपूर्वीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता.याबाबत पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले आदींनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी रणजीत पत्नीचा खून करुन पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

