पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे एका तोतया आयएएस अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.पुण्यात एका तोतया आयएएस अधिकाऱ्याचा स्पर्दाफास करण्यात पोलिसांना यश आले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून त्याला अटक केली आहे.
एका तोतया आयएएस अधिकारी असल्याचे भासवून औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित होता. पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे वय 54 वर्ष रा प्लाॅट नं.336 रानवारा राे हाऊस तळेगाव दाभाडे पुणे असे अटक करण्यात आलेल्या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.
वासुदेव तायडे याने आपले खरे नाव लपवून डॉ. विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो सांगत होता.औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेला डाॅ. विनय देव याने आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांचेकडे संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांना संशय वाटला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत विनय देव याचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लोकांमध्ये वावरत असल्याचीही कबुली त्याने दिली. चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

