पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ४२० / २०२२ मा द वि कलम ३०७, ३२६, ३२४, ३२३, १४३. १४५, १४७, १४९, ५०४, ५०६ अॅक्ट कलम ४(२५), राह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ सह लॉ कलम महाराष्ट्र संघटित गुनगारी नियंत्रण कायदा सन १९९९ कलम ३ (१) (ii), ३(२) प ३(४) मधील पाहिजे आरोपी नामे सूरज संतोष ढवळे वर्षे रा. वाघजाई मंदिराजवळ देशमुख प्लाझा शेजारी साईनगर हिंगणे खुर्द पुणे मुळ पत्ता मु पो खोपी ता खेड जि रत्नागिरी हा गेली आठ महिन्यापासून फरार असून त्याचा शोध तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे घेत होते.
दि. ०४/०६/२०२३ रोजी तपास पथकातील पोलीस अधिकारी सचिन निकम सहायक पोलीस निरीक्षक याना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी सुरज संतोष के हा चिपळुन येथे असल्याची खात्री लायक बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी ही मा. वरिष्ठांनी कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावून खात्री करुन पुढील योग्य ते कारवाई करण्याचे आदेश दिल्याने लागलीय सपोनि सचिन निकम, आंबा उत्तेकर सहायक पोलीस फौजदार, पोलीस अंमलदार देवा चव्हाण असे दिपळुन जि. रत्नागिरी येथे जावुन स्थानिक पोलीसांनी मदत घेवून सदर आरोपीचा मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून शोध घेतला असता, आरोपी सुरज संतोष ढवळे यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास चिपळुन जि.रत्नागिरी येथून ताब्यात घेवुन मा. श्री. राजेंद्र गलांडे सो सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर याचे समोर हजर केले असुन पुढील तपास मा. श्री. राजेंद्र गलांडे साो, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुर्ण शहर हे करीत आहेत.
सदरची ही मा. श्री. सुहेल शर्मा पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ -०३ पुणे शहर मा. राजेंद्र गलांडे सो सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर मा यांच्या मार्गदर्शनाखाली. श्री. अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, श्री. सचिन निकम, सहा. पोलीस निरीक्षक, गणेश मोकाशी पोलीस उपनिरीक्षक श्री. आबा उत्तेकर, सहा. पोलीस फौजदार पोलीस अमलदार संजय शिंदे, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, अमित बोडरे विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे यांनी केली आहे.

