जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- परतुर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हात जातीवादी लोकांनी बौध्द समाजाच्या तरुणाला धारधार शस्त्राने वार करून निर्घृण पने हत्या केली. या घटनेचा निषेध आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून आज दि. 6 जून रोजी उपविभागीय अधिकारी परतुर यांना निवेदन देण्यात आले.
नांदेड जिल्हातील मोजे बोंडार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणुक काढल्यामुळे तेथील गावगुंडांनी मिळून अक्षय भालेराव या युवकाची तिक्ष्ण हत्यारांनी निघृणपणे हत्या केली व नंतर बौद्ध वस्तीवर जाऊन तेथे दगडफेक केली. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या तलवारी होत्या व त्यांनी गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
तरी सदरील हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून अक्षय भालेराव हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवुन त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यायी व पिडीत कुटूंबाचे पुनर्वसन करून कुटूंबाला शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य देवून मयत अक्षय भालेकर यांचे भाऊ यांना शासकीय सेवेत रुजू करुन घेण्यात यावे व सदरील गावाला ग्रामपंचायतला मिळणारे शासकीय अनुदान त्वरीत बंद करून गावगुंडांची स्थावर मालमत्ता (प्रॉपर्टी) जप्त करण्यात यावी.
वरील सर्व बाबींची शासन स्तरावर दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद प्रसानाने घ्यावी. अशा इशारा यावेळी रवींद्र भदर्गे परतूर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात देण्यात आला.
रवींद्र भदर्गे परतूर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, आकाश मुळे, बाळू झोटिंग, महादेव पैठने, उत्तम साबळे, सिद्धार्थ पानवले, मनोज वंजारे, अशोक काकडे, मगर पंडितराव, कपिल घायतकर, विकास भिंगरे, विलास सौंदर्य, सिद्धार्थ कांबळे, सतीश खडांगले, संकेश खडांगले, आकाश वाघमारे सह गावातील अनेक नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनिधी बनण्यासाठी आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

