पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०६/ १२ / २०२२ रोजी दुपारी ०२ वाजण्याचे सुमारास एक महिला दवाखान्यातुन उपचार घेवुन मोटारसायकल वरुन घरी जात असताना तिला संत तुकाराम साखर कारखाना कासारसाई जवळ एका अज्ञात इसमाने अडवुन मारहाण करुन तीचे गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र, कानातील टॉप्स, अंगठी जबरदस्तीने हिसकावुन जबरी चोरी करून तेथुन पळुन गेल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नंबर-११८४/२०२२ भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा नोंद होता. तसेच दि. ०४/०२/२०२३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याचे सुमारास दोन अज्ञात इसमांनी डेन्टल क्लिनीक, कासारसाई येथे डेंटल क्लिनीक मध्ये एकटया असलेल्या महिलेला पाहुन तिचे डोळ्यात मिरची पुड टाकुन तीचे गळ्यातील सोन्याची चैन व पर्स जबरदस्तीने हिसका मारुन चोरी करून तेथुन पळुन गेल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नंबर- १०० / २०२३ भा.द.वि. कलम ३९२. ३४ प्रमाणे गुन्हा नोंद होता. तसेच अशाच प्रकारच्या शिरगाव, देहुरोड व तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे देखिल अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. सदरचे प्रकार गंभीर स्वरुपाचे असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, विनयकुमार चौबे सो यांनी सदर बाबत गुन्हे शाखेने लक्ष घालुन आरोपी अटक करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार आम्ही गुन्हे शाखा युनिट-४ कडील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असल्याने सदर घडलेल्या गुन्ह्यांबाबत तांत्रिक विश्लेषण करुन व बातमीदारांना सतर्क करुन आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हा सदर घडलेल्या गुन्हयांबाबत पोहवा / तुषार शेटे व पोशि/प्रशांत सैद यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणा व्दारे आरोपी निष्पन्न केला. परंतु आरोपी हे खुप चालाक असल्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या साधनांचा वापर करत होते. तसेच त्यांचे राहण्याचे ठिकाणा नसल्याने मागील दोन महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावला होता परंतु त्यांना पकडणे खुप कठिण जात होते. तेव्हा केलेल्या तांत्रिक विश्लेषणा व्दारे सदर आरोपी हे दि. ०७/०६/२०१३ रोजी हिंजवडी परिसरात असले बाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा. फौजदार नारायण जाधव, आबासाहेब किरनाळे, पोना / वासुदेव मुढे पोना / सुनिल गुट्टे, पोना / सुरेश जायभाये, पोशि/ सुखदेव गावंडे, पोशि/ धनाजी शिंदे, पोशि/ गोविंद चव्हाण यांची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले. तेव्हा गेलेले पथकाने हिंजवडी परिसरात सापळा लावुन आरोपी नामे बुद्धदेव विष्णु विश्वास, वय २४ वर्षे, रा- पुणे फिरस्ता मुळ राहणार गाव-बर्धमान, थाना-कोकोबेन, जिला-दुर्गापुर, राज्य-पश्चिम बंगाल व मिंटु मिहिर विश्वास, वय-२६ वर्षे, सद्या रा व्दारका हॉटेल, बालाजी मंदिरा जवळ, आळंदी रोड, भोसरी, पुणे. मुळ राहणार- गाव- बर्धमान, थाना-कोकोबेन, जिला-दुर्गापुर, राज्य-पश्चिम बंगाल यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे कडे कसोशिने तपास केला असता त्या दोघांनी वर नमुद गुन्हा केल्याचे व त्यांनी खालील प्रमाणे ०७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर
आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी हिंजवडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
१) हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ११८४/२०२२ भा.दं.वि. कलम ३९४
२) हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- १००/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४
३) शिरगाव पोलीस ठाणे गु.र.नंबर- / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२
४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, गु.र.नंबर-२५५/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२
५) देहुरोड पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ७३०/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२
६) देहुरोड पोलीस ठाणे, गु.र.नंबर-७२६ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९
७) सांगवी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- २४७/२०२३ भा. दं.वि. कलम ३७९
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय / गुन्हे स्वप्ना गोरे मँडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सतिष माने सो यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोहवा / प्रविण दळे, रोहिदास आहे, तुषार शेटे, मोहम्मद गौस रफिक नदाफ पोना / वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा / नागेश माळी, पोशि/ पोपट हुलगे यांनी केली आहे….

