ईसा तडवी जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार सम्पूर्ण देशभरात एकाच दिवशी बामसेफ चे तालुका स्तरीय प्रशिक्षण शिबिर राबविले जात आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात 15 तालुक्यामध्ये ट्रेनिंग कैम्प सम्पन्न झाले आहे.
पाचोरा मध्ये बामसेफ चे तालुका स्तरीय प्रशिक्षण शिबिर 25 जून रविवार रोजी अहीर सुवर्णकार मंगल कार्यालय येथे तालुका स्तरीय कैडर कैम्प यशस्वी पार पडला. सदर प्रशिक्षण शिबिरास विक्रमजी रामचंद्रजी सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कॅम्पचे उद्घाटन पर मनोगत ॲड. अनिलजी पाटिल यांनी मांडले. प्रशिक्षणाच्या प्रस्तावना करिता किसन सूर्यवंशी यांनी केली.
यावेळी सदर कैम्प मध्ये नवीन मूलनिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तसेच सदर प्रशिक्षणा दरम्यान विक्रमजी सोनवणे यांना रु.1590 इतका (रुमाली फण्ड) जनांदोलन निधि सुपुर्द केला. त्यामुळे सर्व उपस्थितांचे खुप आभार मानण्यात आले.
सदर प्रशिक्षण शिबिरास उपस्थित गफूर फकीरा तड़वी आरएईपी जिल्हाध्यक्ष, यांचे मोलाचे सहकार्य लाभले, ॲड. अनिल पाटिल, ॲड. रणजीत तड़वी, ॲड. अमोल म्हस्के सह, दीपक आदिवाल, आर.आर. सोनवणे, किशोर डोंगरे, अशोकजी मोरे, नंदलाल आगारे, अबजल तड़वी, खंडूभाऊ सोनवणे, बबन बगल, शौकत तड़वी, सुनील तड़वी, अकबर तड़वी, फिरोज तड़वी, विशाल सोनवणे, संतोष कदम, जय सावले, तुषार खेड़कर, रज्जाक तड़वी, फारूक तड़वी, इरफान तड़वी, यूनुस तड़वी, कलीम तड़वी, शरीफ तड़वी, समीर तड़वी, शाहरुख तड़वी असे बामसेफ तथा भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, प्रोटान, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांति मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघ, नफ अशा वेगवेगळ्या विंग्स चे जवळ जवळ 29 नवीन जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

