Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भीम आर्मीचे चीफ चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार, आरोपींने केली चार राऊंड फायरिंग, उचारासाठी रूग्णालयात दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, संपादकीय
0 0
1
भीम आर्मीचे चीफ चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार, आरोपींने केली चार राऊंड फायरिंग, उचारासाठी रूग्णालयात दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेश:- राज्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भीम आर्मीचे चीफ आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यातील सहारनपूर येथे त्यांच्यावर गोळीबार झालाय. चंद्रशेखर आझाद गाडीने जात होते. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. पण आझाद यांना कंबरेला गोळी चाटून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. आझाद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद हे मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करून गरीब नागरिकाच्या हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे त्यांचे देशभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. चंद्रशेखर आझाद हे काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. तिथून ते आपल्या घरी परत जात असताना ते एका कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावणार होते. ते ड्रायव्हरच्या बाजूला फ्रंटसीटवर बसले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. पण त्यांच्या कंबरेला गोळी चाटून गेली आहे. तसेच गाडीच्या काचा फुटल्या आहेत. गाडीच्या फ्रंटसीटला गोळीमुळे खड्ड पडलं आहे. संबंधित घटनेनंतर गाडीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये सगळं स्पष्टपणे दिसत आहे.

चंद्रशेखर हे एका कार्यक्रमासाठी सहारनपूरच्या देवबंद येथे पोहोचले होते. ते त्यांच्या फॉर्चूनर कारने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संबंधित हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करुन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या गाडीचा नंबर हा हरियाणाचा आहे. त्यामुळे आरोपी हरियाणाचे आहेत की त्यांनी नंबरप्लेट बदलली होती, याबाबतचा खुलासा पोलीस तपासात उघड होईल. आरोपींना चार राऊंड फायरिंग केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात चंद्रशेखर यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. त्यांच्या गाडीवर गोळ्या लागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

संबंधित घटनेनंतर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपींनी हल्ला का केला, त्यांचा नेमका उद्देश काय होता? त्यांना चंद्रशेखर यांना का जीवे मारायचं होतं? असे प्रश्न निरुत्तर आहेत. पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधून काढतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445345/7385445348

Previous Post

अमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर ची कौतुकास्पद कामगिरी ! समर्थ पोलिस स्टेशन हद्दी मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त

Next Post

राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या वकिलांचा जाहीर सत्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या वकिलांचा जाहीर सत्कार

राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या वकिलांचा जाहीर सत्कार

Comments 1

  1. किर्तीसंध्या says:
    3 years ago

    जाहीर निषेध. 😡 आतापर्यत आंबेडकरी चळवळ चालवणार्या ग्राऊंड कार्यकर्ताचा छळ व जिव जात होता. पण नेत्याकडेही वाकडी नजर वळु लागली आहे. एकसंघ होणे गरजेचे आहे. सोशल वर नाही प्रत्यक्षात…. हो ना जयभीम नमो बुद्धाय🙏🏻

    Reply

Leave a Reply to किर्तीसंध्या Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In