Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या! आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 29, 2023
in अहमदनगर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या! आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

एमपीएससी विदयार्थ्यांच्या समस्या सोडविण्या साठी आमदार सत्यजीत तांबे सरसावले, पत्राद्वारे शुल्क कमी करण्याची केली मागणी

राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापरीक्षांसाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. आमदार तांबे यांनी याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे व त्याद्वारे ही मागणी केली आहे. हे शुल्क कमी करुन सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एमपीएससी परीक्षांसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात. या परीक्षांमध्ये राज्यातील अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. अनेकदा या परीक्षार्थ्यांकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क अवाजवी असते. त्यामुळे कुठल्याही उमेदवाराला आर्थिक परिस्थितीचा फटका बसू नये व त्यांना अगदी सहजतेने व सुलभतेने या परीक्षा देता याव्यात, यासाठी परीक्षा शुल्क कमी करावे अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

सध्या एमपीएससी कडून परीक्षा शुल्क म्हणून खुल्या वर्गासाठी ३९४ रुपये व आरक्षित वर्गासाठी २९४ रुपये इतकी रक्कम आकारली जाते. शुल्क कमी केल्यास त्याचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होईल, असे आमदार तांबे म्हणाले. वास्तविक लोकप्रतिनिधी लोकांच्या समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांपुढे वाचतात. मात्र आ. तांबे यांनी फक्त समस्या न पोहोचवता या समस्या कश्या सोडवता येतील, याबाबतच्या काही उपाययोजनां बाबतही शिक्षणाधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करतात. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ दृष्टिकोनाला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे समस्यांवर फक्त बोट न ठेवता त्या समस्या कशा सोडवल्या जातील, याकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. लोकप्रतिनिधींनीही फक्त समस्या मांडण्या पुरता आपला दृष्टिकोन मर्यादित ठेवू नये, असं मला वाटतं. एखादा प्रश्न सोडवण्याचा काही उपाय असेल, तर त्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा करायला हवी. अर्थात प्रशासकीय बाबींमध्ये अंतिम निर्णय अधिकाऱ्यांचाच असतो. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे असे उपाय सुचवायला हवेत, असं आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी मागील काही वर्षांपासून आहेत. त्या दूर झाल्यास त्यांच्यासमोरच्या मोठ्या समस्या दूर होतील. याचा फायदा शेवटी विद्यार्थ्यांना आणि एमपीएससीला होईल. त्यामुळे ते सोडवण्यावर भर द्यायला हवा. यावर तातडीने तोडगा काढणं आवश्यक असल्याचे आ. तांबे म्हणाले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सांगली: लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडले लाखोचे घबाड, कागदपत्रे जप्त करून एसीबी ने ठोकल्या बेड्या.

Next Post

नागपूर: केळवद पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: केळवद पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त.

नागपूर: केळवद पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In