गुन्हे प्रकटीकरण पथकाची दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही चारचाकी वाहनासह एकूण 3,49,400/- रु. चा देशी-विदेशी दारू साठा जप्त.
प्रवीण जगताप, प्रतिनिधी
वर्धा दि.26ऑगस्ट:- वर्धा जिल्हात दारू बंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रोजी चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात येत आहे. एका गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वर्धा नागपूर रोडवर मौजा पवनार येथे येथे सापळा रचून नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे स्विफ्ट क्र. MH-02/AL-6253 हे चारचाकी वाहन येतांना दिसले सदर वाहनास थांबवून वाहनाची झडती घेतली असता १) सहा खर्डाचे खोक्यात विदेशी दारुने भरलेली ओसी कंपनीच्या चार खर्डाचे खोक्यात विदेशी दारुने भरलेल्या ओसी ब्लु, तिन खयाचे खोक्यात देशी दारुने भरलेल्या टँगो ४) एका खर्डाचे खोक्यात विदेशी दारुने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या ५) एका खर्डाचे खोक्यात टुबर्ग कंपनीच्या बियर टिनकॅन ६) एका खर्डाचे खोक्यात हायवर्ड ५००० कंपनीच्या बियर टिनकॅन ७) एक जुनि वापरती ऑरेंज कलरची मारुती सुझुकी स्वीप्ट चारचाकी क्र. एमएच 02/AL 6253 असा एकूण 3,49,400 रु. चा माल मिळुन आल्याने सदर माल जप्त केला.
या अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपी १) सौरभ प्रकाश गांवडे, वय 21 वर्ष, रा. भाईमारे ले-आउट, वर्धा, २) सुरज रामकृष्ण राउत, वय 25 वर्ष, रा. शांती नगर, वर्धा, ३) सुरेश उर्फ रिहांश संतोष राजपूत, वय 25 वर्ष, रा शांती नगर, वर्धा, ४) तुषार उर्फ कुशाब प्रभाकर बादलनवार, वय 26 वर्ष, रा. भाईमारे ले-आउट, वर्धा व एक महिला आरोपी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पो.नि. निलेश ब्राम्हाणे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार हरिदास काकड, गजानन कठाणे, विलास लोहकरे, अभय इंगळे व महिला पोलीस अंमलदार प्रगती झामरे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केली.