प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची कामाची चौकशी करून तत्काळ मनमानी कारभार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा ग्रामस्थांनी मागणी.
रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर तालुक्यातील परतूर – सेलू रोडवर असलेले मौ. मापेगांव बू (पुनर्वसन) गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम चालू आसुन सदरील काम हे नियमबाह्य पद्धतीने चालू आहे. हे पुनर्वसन विभागाने राखीव ठेवलेल्या (गोठाण, गुरुचरण, खळवाडी) याठिकाणी सद्या होत आहे. ह्या जागा पुनर्वसन विभागाने राखीव ठेवलेल्या आहेत.या मध्ये बांधकाम करता येत नाही. त्याच प्रमाणे गावात होणारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम कोणत्या ठिकाणी करावे यासाठी ग्रामपंचायींतीने 2021साली ठराव घेउन मौ. मापेगाव येथील राणीवाहेगाव पुनर्वसनाच्या उत्तरेस असलेल्या खुल्या जागेत गुंजाळ यांच्या भुखंडाजवळ सदर कामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. आणि या कामासाठी पाटबंधारे विभाग जालना यांच्याकडे नाहरकत घेतली होती.
पण ग्रामपंचायत आणि प्रशासनाने मंजूर केलेल्या जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र न उभारता आपल्या मनमर्जीने प्रशासनाच्या आणि ग्राम पंचायच्या आदेशाची अवहेलना सुरू आहे. याबाबत प्रशासनाला पुरावे सादर करून देखील प्रशासनाने कोणती कारवाई केली ? याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
मात्र आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम हे नियमबाह्य पद्धतीने केले आहे व त्यांची चौकशी करायला प्रश्नाला इतका विलंब का लागतो? या प्रश्नाला आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. आज उपोषणाला पाच दिवस पुर्ण झाले मात्र प्रशासनाचे कुठलेच उत्तर उपोषकर्ते यांना मिळाले नाही. प्रशासनाने लवकरात लवकर हया उपोषणाची दखल घेउन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भरत मोगरे, राहुल देशमाने व ग्रामस्थांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

