कु. डॉ निकिता निखाडे व पोलीस उपनिरीक्षक करुणाताई मुसळे यांच्या सुप्रिया सन्मान गौरव व सामजिक उपक्रम राबविण्यात आले.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार, संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणघाट शहरातील नामवंत समाजसेविकांचा “सुप्रिया सम्मान गौरव” प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात व विभागीय अध्यक्षा डॉ. सुरेखाताई देशमुख यांच्या उपस्थित राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलीस कर्मचारी करुणाताई मुसळे, डॉ. निकिता निखाडे यांच्या शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून करूना मुसळे या सर्वत्र परिचित आहे. हिंगणघाट शहरात वाहतुक विभागात शिस्तप्रिय अधिकारी आहे. तसेच डॉ.निकिता निखाडे यांनी चंचो विद्यापीठ चीन येथून एमबीबीएस केले असून तीन वर्षे इंटरशीप सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली येथे केले. त्यांना गोल्ड मेडलीस्ट सुद्धा मिळाले आहे. हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालयात त्या कार्यरत आहे. त्यांच्या या समाजसेवा कार्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसने त्यांच्या शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, महिला विभागीय अध्यक्षा डॉ. सुरेखा देशमुख, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष सिमा तिवारी, जिल्हा सरचिटनिस सुजाता जाभुळकर, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, तालुका उपाध्यक्ष मिनाक्षी धाकने, तालुका सचिव सुचिता सातपुते, शहर सचिव अर्चना नांदूरकर, रंगारी, युवती शहरअध्यक्ष माधवी देशमुख, शहर उपाध्यक्ष आचल पाटील, युवती सदस्य आचल वकील, सोनाली बाचलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

