पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :-आज दि.०१/०७/२०२३रोजी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ कडील पोलीस अंमलदार पोहवा विनायक रामाने, पो शि अमोल सरतापे व पो शि विनायक येवले लोणीकंद पोस्टे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व विनायक येवले यांचे गोपनीय बातमीनुसार लोणीकंद पो स्टे गु.र.नं ५०५/२०२३ भादवि कलम ३७९ हा गुन्हा ओंकार खुडे यानी केला असून तो वाघेश्वर मंदिर,वाघोली, पुणे येथे आला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी स्टाफ सह जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव ओंकार संतोष खुडे वय २५ रा शिवणे पुणे असे सांगितले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे ३साथीदार १) सागर नाईक २) चंदू सोनवणे ३) अप्पा उर्फ चंदू शिंदे सर्व रा. वारजे माळवाडी, पुणे यांनी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .तरी आरोपी नामे ओंकार संतोष खुडे, वय २५ वर्षे, रा. शिवणे पुणे यास वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करिता लोणीकंद पो स्टे च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे सो, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे सो, मा. सहा पोलीस आयुक्त सतीश गोवेकर सो ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनायक रामाने अमोल सरतापे विनायक येवले यांनी केले आहे.

