पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, वय २२ वर्षे रा. गोकुल पार्क रामचंद्र कॉलेज बकोरी फाटा वाघोली ता. हवेली जि. पुणे व टोळी सदस्य अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, वय २३ वर्षे, रा. गाडे वरती बकोरी फाटा पाघोली ता. हवेली जि. पुणे यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, बकोरी फाटा, लोणीकंद तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करून लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणान्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणान्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होतु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इराम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त श्री. शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त सो. श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त सो..श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो. श्री. संजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मारूती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.
सदरचे तडीपार इसम हे पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास त्यांची माहीती लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काइंगडे यांनी केले आहे.

