वाय बी चव्हाण सेंटर मुंबई येथे शरद पवार यांच्या समर्थनार्थ उद्या होणार मुंबईत दाखल…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पाडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यात अजित पवार यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान वर्धा जिल्ह्यातून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकाऱ्यांसह शरदचंद्र पवार यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून हे शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे आणि फडणवीस यांच्या सोबत घरोबा केला. आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भावना दुखावल्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदिले हे देखील आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांना घेऊन शरद पवार यांना समर्थन करण्यासाठी म्हणून मुंबई येथे वर्धाहून निघाले आहे…
अजित पवारांच्या बंडा नंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडून मोठ्या प्रमाणात शरदचंद्र पवार यांना पाठिंबा दर्शवला होता. व या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घेऊन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले हे मुंबई येथे उद्या आयोजित केलेल्या वाय बी सेंटर येथील बैठकीस शरदचंद्र पवार यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून निघाले आहेत.
कार्यकर्ता शरद पवार यांच्या पाठीशी… अजित पवार यांनी जरी अनेक आमदार यांच्या बरोबर बंड केल असेल तरी अनेक कार्यकर्ते आज पण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते अजित पवार यांचा संपाप व्यक्त करून विरोध करत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसून येत आहे.

