पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मयत सोन्या तपकीर च्या खुनाच्या गुन्ह्यातील मास्टर माईंड कुख्यात सराईत आरोपी करण रोकडे सह तीन आरोपींना पिंपरी चिंचवड गुंडाविरोधी पथकाने भारत नेपाळ बॉर्डरवरून मोठ्या सीताफिने ताब्यात घेतली आहे आरोपी करण रोकडे हा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.१) करण रतन रोकडे( वय २५ वर्ष रा. आंबेडकर भवन समोर, चिंतामणी नगर रोकडे वस्ती चिखली पुणे) २)ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे रा.वरील प्रमाणे) ३)रिंकू दिनेश कुमार (वय १९ वर्ष,) आणि विधी संघषित बालक असे ताब्यात घेतलेले यांची नावे आहेत.पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सोन्या तापकीर हा वरचढ होईल व तो आपलाच काटा काढील या भीतीने सराईत आरोपी करण रोकडे यांनी त्याच्या साथीदाराच्या मदतीने कट रचून ( ता. २२) मे रोजी सोन्या तपकिरचा पिस्तुलाने गोळीबार करून खून केला होता.सोन्या तापकीर याचा खून केल्यानंतर अटक टाळण्यासाठी आरोपी करण रोकडे ,ऋत्विक रोकडे, रिंकू कुमार आणि एक विधी संघर्षित बालक हे लोणावळा, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, या राज्यात राहण्याची ठिकाणे वेळोवेळी बदलून स्वतःचे अस्तित्व लपून राहत होते.
गुंडाविरोधी पथकातील मयूर दळवी, सुनील चौधरी, व विजय तेलेवाल यांच्या टीमला आरोपी करण रोकडे बाबत माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस अमंलदार शाम बाबा यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी करण रोकडे हा उत्तर प्रदेश येथील मथुरा येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षण हरीश माने व स्टाफ यांनी उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे धाव घेतली. परंतु मथुराला गेल्यानंतर आरोपी करण कुकडे हा मथुरा पासून पासून ७५०किलोमीटर लांब भारत नेपाळ बॉर्डर पासून मधुबन जि. म ऊ ,राज्य उत्तर प्रदेश येथे आहे .तसेच तो नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीमध्ये असल्याची खात्रीशील बातमी पथकाला प्राप्त झाली .
गुंडाविरोधी पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी त्वरित आरोपी राहत असलेल्या ठिकाण व ईमारतीचे माहिती घेतली .स्थानिक पोलीसाची मदतीनेआरोपी राहत असलेली इमारतीला पथकाने वेढा घातला मात्र आरोपी करण रोकडे याला पोलिसांची चाहूल लागताच तर तो आपल्या०३ साथीदारासह इमारतीच्या पहिल्या मजल्यावर उडी मारून शेतात पळून जाऊ लागला पथकाने आरोपी चा पाठलाग करून सर्वांच्या सीताफिने ताब्यात घेतले व पोलिसांच्या ताब्यात दिले आरोपींना गुरुवार (ता ६) पर्यंत पोलिस कोठडीत रिमांड घेण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत
आरोपी करण रोकडे यांच्याविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस स्टेशनला एकूण ११गुन्हे दाखल आहेत आरोपी ऋत्विक याच्यावर एकूण १० गुन्हे दाखल आहेत. तर रिंकू कुमार यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात ०२गुन्हे दाखल आहेत एका गुन्ह्यातून चिखली पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी आहे.
सादरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे ,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी ,पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे ,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने ,सहाय्य पोलीस निरीक्षक सागर पानमंद पोलीस अमंलदार हजर पठाण ,प्रवीण तापकीर, सोपान ठोकळअण्णा ,गंगाराम चव्हाण , विक्रम जगदाळे ,गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुरेश चौधरी , नितीन गेंंगजे,शाम बाबा, विजय तैलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते , शुभम कदम ,ज्ञानेश्वरी गिरी, तोफिक शेख, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पत्नी कारवाई केली आहे.

