हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्तदानासारखे पुण्य कार्य जगात कोणतेही नाही. ही भावना लक्ष्यात ठेवून “श्री”गौरव परिवार चंद्रपूर व बल्लारपुर युवक कांग्रेस ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त ४ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन “श्री” गौरव परिवार, चंद्रपूर व माजी नगरसेवक कुशल पुगलिया यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश युवक कांग्रेस सहसचिव चेतन गेडाम होते.
यावेळी प्रदेश कांग्रेस कमिटी सदस्य घनश्याम मूलचंदानी, इंटक अध्यक्ष शंकर दास जिल्हा महासचिव शंकर महाकाली, युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, एनएसयुआई जिल्हाअध्यक्ष शफाक शेख माजी नगराध्यक्ष छाया मड़ावी, माजी नगर सेविका शोभा महतो, माजी न.प गट नेता देवेंद्र आर्य, माजी नगरसेवक भास्कर माकोड़े, माजी नगरसेवक विनोद आत्राम, सुधिर अमराज सामाजिक कार्यकर्ता नासिर (भुरूभाई) युवक कांग्रेस शहर अध्यक्ष अरविंद वर्मा, दानिश शेख, उपाध्यक्ष अजय रेड्डी,उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, महासचिव अकरम शेख़, सचिव बशीर सिद्दीकी, कमलेश माकोड़े, अध्यक्ष करण कामटे, महेश माकोड़े, सोशल मीडिया अध्यक्ष संजय घुग्लोत, संदीप नाक्षिणे, अमोल काकड़े, राजू घुगरे, विजय वर्मा, रोहित खान, गोपाल कलवला, कार्तिक दरेकर, सचिन कौरासे, आकाश दुर्गे, राहुल रामटेके, शब्बीर शेख, अभिलाष, इमरान शेख, आफताब पठान, सिधु बिमानवार, राजकरण निषाद, सुनील यादव, सुमित शेंडे, सुधिर बेजलवार शिवम लोनारे यांची उपस्थिती होती.
यावेळी भविष्यात गरजु रुग्णांस रक्ताची गरज भासू नये, यासाठी ४९ युवकानी रक्तदान करून दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त खरी आदरांजली वाहण्यात आली, यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे आयोजक “श्री” गौरव परिवार, चंद्रपूर व बल्लारपुर युवक सर्वाचे आभार मानले.

