Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

जालना: मागासवर्गीय व मुस्लिम समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 11, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
जालना: मागासवर्गीय व मुस्लिम समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला समविचारी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता.

वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते फारूख अहेमद, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, जालना जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र शिरसाट, प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चमन येथून हा मोर्चा काढण्यात आला. सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी प्रास्ताविक करतांना महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लढा उभारला असून या लढ्यात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सविताताई मुंढे, जितेंद्र शिरसाट, अशोक हिंगे पाटील, दीपक डोके यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना सत्ताधारी मंडळींचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप करून जातीयवादी विचारसरणीचे सरकार उलथून टाकण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीत असल्याचे सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचारास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जातीयवादी प्रवृतीला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करावे, असे आवाहन केले.

या सभेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ट मंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते मागासवर्गीय व मुस्लिम समाजावरील अत्याचार रोखण्याची तसेच अत्याचारग्रस्तांना आर्थिक मदत व अत्याचार प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले.

या जन आक्रोश मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव,शफीक अत्तार,जिल्हा महासचिव किशोर त्रिभुवन, जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर तालुका उपाध्यक्ष महादेव पैठणे सोयब पठाण तालुका सल्लागार विजय खरात बाळू झोटिंग आकाश मुंढे अनिल वाघमारे अशोक काकडे आकाश वाघमारे रवि वाहुळे प्रशांत वाकळे सतीश पहाडे यांच्यासह जालना जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

सांगलीत मुस्लिम, बहुजन समाजावर वाढत्या अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा.

Next Post

गोंडपिपरी: गुप्तधनाच्या आशेने दुर्मीळ कासव घरी आणलं, पैशांच्या पावसाऐवजी तुरुंगाची हवा, कासवाची किंमत २५ हजार रुपये.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडपिपरी: गुप्तधनाच्या आशेने दुर्मीळ कासव घरी आणलं, पैशांच्या पावसाऐवजी तुरुंगाची हवा, कासवाची किंमत २५ हजार रुपये.

गोंडपिपरी: गुप्तधनाच्या आशेने दुर्मीळ कासव घरी आणलं, पैशांच्या पावसाऐवजी तुरुंगाची हवा, कासवाची किंमत २५ हजार रुपये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In