Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दक्षिण नागपूर शाखेच्या वतीने प्रात्याक्षिक कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 11, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दक्षिण नागपूर शाखेच्या वतीने प्रात्याक्षिक कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दक्षिण नागपूर शाखेच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील समस्त सभासदांना व मुलामुलींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळाला यासाठी एक प्रात्याक्षिकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या प्रशस्त सभागृहात मोठ्या हर्षोल्लासात ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मायाताई चौरे, माजी नगराध्यक्ष कामठी ह्या लाभल्या होत्या तर अध्यक्ष म्हणून रामभाऊ डोंगरे, राज्य कार्यकारिणी सदस्य म. रा. हे उपस्थित होते. परीक्षक म्हणून मंचकावर चित्तरंजन चौरे जिल्हा कार्याध्यक्ष नागपूर, देवानंद बडगे कार्याध्यक्ष उत्तर नागपूर, वसंत मोहिले, दक्षिण शाखा, व विजया श्रीखंडे रा. का सदस्य ई मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला संविधानाच्या उद्धेशीकेचे वाचन मंगला गाणार व माही मोहिले यांनी केले,तर उद्घाटन चमत्कारी पाण्याच्या दिवा प्रज्वलित करून मान्यवरांनी केले. या पाण्याच्या दिव्याचे प्रात्यक्षिक उ.ना शाखेचे कार्याध्यक्ष देवानंद बडगे यांनी केले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना शशीकांत बनकर यांनी प्रस्तुत केली.या कार्यशाळेत चमत्कार सादरीकरण, गायन, चळवळीची गीतें, वादन कला, नृत्यकला, पथनाट्य, एकपात्री नाटक, वेशभूषा, नक्कल, मिमिक्री व हातचलाखी ई. प्रयोग सादर करण्यात आले. गायन कलेमध्ये – सुरवातीला कळमेश्वर शाखेचे कार्याध्यक्ष व प्रबोधनकार अरुण शहारे यांनी अंधश्रद्धा व सामाजिक मन यावर सुंदर गीत प्रस्तुत केले. नंतर चळवळीचे गीते- उत्तरचे देवानंद बडगे व पश्चिमच्या विजया ठाकरे, कविता – चित्तरंजन चौरे, गजानन जी, भीमराव महेशकर , गीत गायन -डॉ. सुनील भगत, देवयानी भगत, इंदु ऊमरे, पुर्व शाखेचे गौतम पाटील, चंद्रशेखर मेश्राम, मंगला गाणार, पूनम डोंगरे, हर्षा कापसे, रंजना डूमोरे,प्रितम शंभरकर, उन्नती शंभरकर, भास्कर रामटेके, हेमंत गांजरे काटोल शाखा, राजेंद्र कांबळे, गंगा खांडेकर, विजया श्रीखंडे, मनोज गोडघाटे, सम्यक उके, तर इंस्ट्रुमेंटल राजेश लाडे, भास्कर रामटेके, हार्मोनियम – राजेंद्र कांबळे सर, सी बी.वैरागडे , तबला वादन कलेत – प्रा.पाटील सर कळमेश्वर शाखा, व ढोलक वादन प्रा. सी बी वैरागडे , अजिंक्य बांगडे काॅमेडी, नृत्य कलेत सुषमा शेवडे, पार्थवी शंभरकर व पूनम मेश्राम तर एकपात्री अभिनयात शालीनी सरोदे, अजय रहाटे, शशीकांत बनकर, हातचलाखी – वसंता मोहिले . उत्तर शाखेच्या गंगा खांडेकर व चंदा मोटघरे यांनी “मी रमाई बोलते” आणि वर्षा शहारे यांनी “मी सावित्रीबाई फुले” यांवर एकपात्री नाटक प्रस्तुत केले . सर्व कलाकारांनी आपापली कला सादर करुन सर्वांची मने जिंकली.

दक्षिण नागपूर शाखेचे सांस्कृतिक प्रमुख शशीकांत बनकर यांच्या अथक प्रयत्नातून हे अभीनव उपक्रम साकार कले गेले. या प्रसंगी प्रमुख अतिथी समाज सेविका मायाताई चौरे माजी नगराध्यक्ष म्हणाल्या की महाअंनिस प्रत्यक्ष तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन समाजात व्याप्त अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करते हे खरोखरच कौतुकास्पद आहे.या कार्यासाठी मी महाअंनिस ला हार्दिक शुभेच्छा देते व सोबत राहुन सहकार्य करण्याचे आश्वासन देते. अध्यक्ष मा.रामभाऊ डोंगरे म्हणाले की दक्षिण नागपूर शाखेत एवढे अष्टपैलू कलागुणवंत असतील याची कल्पनाच केली नव्हती.सर्वांचे अप्रतिम सादरीकरण असुन यातूनच प्रतिभावान कलावंत निर्माण होतील.

या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रधान सचिव डॉ. सुनील भगत तर आभार प्रदर्शन प्रितम शंभरकर दक्षिण शाखा सोशल मीडिया प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाला अविनाश तायडे, पुनम डोंगरे, पुनम भवरे, डॉ. विकास होले, सुषमा होले, वैशाली बनसोड, विजय पाटील, रेखा पाटील , उत्कर्ष शंभरकर, सुरेंद्र शेंडे हिंगणा, माया सुखदेवे व अविनाश सुखदेवे, अशोक राऊत,जयप्रकाश धोंगडे, बी जी राऊत, संजीवनी लाखे, अश्विनी मिराशे, स्वपनील सावरकर, निकीता लेनगुरे, सीमा श्रीरामे, बाबासाहेब खरे,शोभा पाटील, उषा सुरेश ढोणे, विजय पारधी,यांनी सहकार्य केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी ! नगरसेवक मेहबुब पानसरे यांच्या निर्घृण खुनातील मारेक-यास केले जेरबंद

Next Post

अवैध दारु वाहतुकीवर कारवाई, वाहनासह 6 लाखाचा माल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अवैध दारु वाहतुकीवर कारवाई, वाहनासह 6 लाखाचा माल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

अवैध दारु वाहतुकीवर कारवाई, वाहनासह 6 लाखाचा माल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In