✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.11:- सावंगी ते सालोड व गुंजखेडा ते पुलगाव मार्गावर चारचाकी वाहनामध्ये अवैधपणे विदेशी व गावठी दारुच्या होत असलेल्या वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6 लाख 23 हजार 370 रुपयाच्या वाहनासह दारु जप्त करण्यात आली. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक मोहन पाटील यांच्या नेत्वृत्वात भरारी पथकाने केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी सावंगी ते सालोड मार्गावर सुजुकी कंपनीचे रिट्ज वाहन क्रमांक एमएच-32- सी-6463 या चारचाकी वाहनामध्ये अवैधपणे विदेशी दारुची वाहतुक करतांना एका एआरोपीस अटक करुन 3 लाख 770 रुपयाचा तर गुंजखेड ते पुलगाव मार्गावर शेवरलेट कंपनीचे तवेरा वाहन क्रमांक एमएच-28-एन-3864 या चारचाकी वाहनामध्ये अवैधपणे गावठी दारुची वाहतुक करतांना दोन आरोपीस अटक करुन 3 लाख 22 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीवर गुन्हा नोंदविला सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील दुय्यम निरिक्षक सुरेंद्र बुटले, जवान मिलींद लांबाडे, अमित नागमोते व वाहन चालक योगेश गांवडे यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदाचे कलम 65(अ)(ई),81,83 नुसार कारवाई केली असे, राज्य उत्पादशन शुल्क विभागाने कळविले आहे.

