Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वाशिमचे नागरिक भगवान भरोसे, पंधरा दिवसांपूर्वी बनलेला रस्त्याचे डांबर निघून त्यात पडले जीवघेणे गड्डे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 12, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वाशिमचे नागरिक भगवान भरोसे, पंधरा दिवसांपूर्वी बनलेला रस्त्याचे डांबर निघून त्यात पडले जीवघेणे गड्डे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशीम:- येथील एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.15 दिवसापूर्वी बनवलेला डांबरी रस्ता पहिल्याच पावसामुळे वाहत गेला असून रस्तावर मोठ्या प्रमाणात गड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यात गड्डे की गड्ड्यात रस्ते हे समजण्या पलीकडे आहे.

मागील अनेक वर्षांपासून खड्ड्यात धक्के खाल्ल्यानंतर कशातरी हा डांबरी रस्ता बनवण्यात आला. त्याला पण आता भष्ट्रतंत्राने ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बनविलेल्या रस्त्या अवघ्या 15 दिवसांत खड्डेमय झाला आहे. तरी पंधरा दिवसांत नव्या रस्त्यावर खड्डे पडल्यास रस्त्याची गुणवत्ता कशी असेल लक्षात येते. यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळावर यांचं काम असते नागरिकांना उत्तम रस्ते निर्माण करणे पण येथील अधिकारी स्वतःचे हित साधून होणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराला भष्ट्राचार करायला मोकळ रान करून देते. त्यामुळे कंत्राटदार हा भष्ट्राचार अमापमाया जमा करत आहे. आणि नागरिक जीवघेण्या गड्डेमय रास्त्यातून प्रवास करत आहे.

वाशीम ते पुसद व कारंजा महामार्गावर जाण्यासाठी पुसद नाका एकमेव पर्याय आहे. पाच वर्षांपासून रेल्वे उड्डाण पूलाचे काम सुरू असल्यापासून हा शंभर मिटरचा रस्ता जिवघेणा झाला होता. दोन ते अडीच फूट खड्ड्यातून नागरीकांना मार्गक्रमण करत त्रास सोसावा लागला.

या रस्त्यावर अनेक अपघात झाले. रस्ता बांधकामासाठी राजकीय व सामाजिक संघटनांकडून अनेक आंदोलने झाली. तेव्हा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला जाग येवून पंधरा दिवसापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले.

पाच वर्षाचा त्रास संपला या आनंदात नागरीक असताना या आनंदाचा अवसानघात झाला. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या डांबरी रस्त्याला आता खड्डे पडत असल्याने या कामाची गुणवत्ता उजागर झाली आहे.

या कामाची किंमत 30 लाख असल्याची माहिती असून कंत्राटदार व रस्ते विकास महामंडळाच्या युतीतून अतिशय निकृष्ट काम झाल्याचा आरोप नागरीकांमधून केला जात आहे. या रस्त्यावर डांबराचे प्रमाण अतिशय अल्प आहे.

पावसाळा असल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात हा दावा रस्ते विकास महामंडळाचे अभियंता सय्यद यांनी केला असला तरी पेरणी करण्यापुरता पाऊस झाला नसताना ही परिस्थिती आहे तर मुसळधार पाऊस झाल्यावर रस्ता राहणार कि जाणार याचे उत्तर रस्ते विकास महामंडळालाच द्यावे लागणार आहे. या रस्त्यावर डांबरीकरण करताना अंदाजपत्रकाला फटाके लावल्यानेच तीस लाखाचा व शंभर मीटरचा रस्ता पंधरा दिवसातच शहिद केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या तीस लाखाच्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असतील तर रस्त्याची गुणवत्ताच सदोष आहे. हे सर्वसामान्य माणसालाही कळते. कंत्राटदाराला याचा जाब विचारण्या ऐवजी पंधरा दिवसाच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे फर्मान एमएसआरडीसीकडून दिले जात असेल तर ही बाब कंत्राटदाराला पाठिशी घालणारी आहे. मुळात बांधकामच निकृष्ट झाले तर वरवरची रंगोटीही किती दिवस टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Previous Post

चंदननगर पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेली किंमती बॅग, महिलेस तात्काळ परत मिळवुन दिली

Next Post

पाल्याच्या आरोग्याची जबाबदारी आईसारखी दुसरे कोणीही घेऊ शकत नाही: प्रमोद तोरणे यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पाल्याच्या आरोग्याची जबाबदारी आईसारखी दुसरे कोणीही घेऊ शकत नाही: प्रमोद तोरणे यांचे प्रतिपादन.

पाल्याच्या आरोग्याची जबाबदारी आईसारखी दुसरे कोणीही घेऊ शकत नाही: प्रमोद तोरणे यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In