डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता.१३:- औद्योगिक कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण करून सुरक्षितता याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस अधिकारी आणि कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला यावेळी पोलीस अधिकारी आणि कंपनी प्रतिनिधी यांना काही सूचना करीत तक्रार निवारण सेल याबाबत माहिती दिली.
शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कंपनी व त्याचे प्रतिनिधी यांच्या करिता शुक्रवार (ता.७) रोजी दुपारी साडेअकरा ते साडेबारा या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ आणि विविध कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून काही सूचना यावेळी कंपन्यांना करण्यात आलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे १) कंपनीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत कंपनीने कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. २)कंपनी परिसर तसेच कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार येथे मोठ्या संख्येत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. ३) कंपनीमध्ये काम करीत असलेल्या महिला कामगार यांच्याबाबत विशेष काळजी कंपनीने घेतली पाहिजे. महिला रात्रपाळीला काम करीत असल्यास त्यांना येण्या जाण्यासाठी वाहनांची विशेष व्यवस्था केलेली असावी. ४) दुचाकी स्वारांना कंपनीमध्ये येताना हेल्मेट बंधनकारक करावे. ५) कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये काही वादविवाद असतील तर याबाबत तत्काळ माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी. ६)कंपनी व ट्रान्सपोर्ट यांच्या बाबतीत काही अडचण असेल तर तत्काळ पोलीस चौकशी संपर्क करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समस्येचे निराकरण व सुरक्षितता या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या औद्योगिक तक्रार निवारण सेल याबाबत पोलीस अधिकारी यांनी कंपनी प्रतिनिधी यांना माहिती दिली.
यावेळी अस सांगण्यास आले की, काही समस्या असल्यास पोलिसांची संपर्क साधावा आणि त्यांना माहिती द्यावी असे आव्हान पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला औद्योगिक कंपनीतील जवळपास ४० ते ५० प्रतिनिधी हजर होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

