आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आगामी निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले; मात्र या फोडाफोडीच्या राजकारणाला आता जनता त्रस्त झाली असून आगामी निवडणुकांत महाविकास आघाडीलाच कौल देणार आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त करून भाजपावर सडकून टीकाही केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या या पत्रपरिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, राजा टाकसळे आदींची उपस्थिती होती. संपूर्ण राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

