पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १०/०७/२०२३ रोजी सकाळी ०६.५५ वा. च्या सुमारास फिर्यादी व त्यांची मैत्रिण नामे सोनली सुहास बटटयार वय ४९ वर्षे हच्या सोबत मॉर्निंग वॉक करून त्यांच्या राहते घरी जात असताना मथुरेवाला गार्डनच्या समोर वानवडी पुणे या ठिकाणी आले असता, पाठी मागुन येवून एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून चोरी करून त्यांच्या साथीदारांसह दुचाकीवरून पळुन गेले म्हणुन वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं ३२९ / २०२३ भादंवि कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनि संतोष सोनवणे यांनी तपास करत असताना, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच मा. पोलीसा उप-आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर यांनी गुन्हा उघडकीस आणणेकरीता दिलेल्या सुचनाप्रमाणे घटनास्थळ वरील सीसीटीव्ही फुटेजची घटनास्थळ ते शिवाजीनगर पाटील इस्टेट भागापर्यंत जवळ पास १०० हुन अधिक कॅमेरे चेक करून तपास पथकातील पोउपनि संतोष सोनवणे, पोअं/ विष्णु सुतार, विठठल चोरमले राहुल माने, संदिप साळवे तसेच राहुल माने यांनी छुप्या पध्दतीने सापळा रचून खालील आरोपीत यांना मोठ्या शिताकिने ताब्यात घेलते आहे. अटक केलेल्या आरोपीत यांचे नावे
१) उदयान दिपक ओव्हाळ, वय २४ वर्ष, रा. केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे व
२) आकाश सुरेश बाघोरे वय २० वर्ष, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे पाठीमागं, शांतीनगर, शिवाजीनगर, पुणे नमूद आरोपीत यांचेकडुन वानवडी पोलीस ठाणे येथील वर नमूद गुन्हयात अटक करून १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व गुन्हयातील दुचाकी वाहन असे एकुण १,००,०००/- किमतीचे मुददेमाल हस्तगत करून २४ तासांच्या आत आरोपीत यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणला आहे..
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोनि (गुन्हे) श्री. पाटणकर व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पोहवा / अमजद पठाण, हरीदास कदम अतुल गायकवाड, पो. अंम अमोल गायकवाड, संतोष नाईक, निलकंठ राठोड, यतिन भोसले व सोनम भगत यांनी केली आहे.

