डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
मोबा न 8796273945
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- मोबाईलवर संभाषण करीत पायी निघालेल्या नागरिकांचे महागडे मोबाईल फोन हिसकावून धूम चित्रपटातील दृश्यप्रमाणे दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ०२ पथकाने बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी या चोरट्यांकडून ०३ गुन्हे उघड करून अँड्रॉइड कंपनीचे ०६ महागडे मोबाईल फोन आणि गुन्हयात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 1) राज उर्फ नन्या आनंद लष्करे वय 19 वर्ष रा. गोंधळे गल्ली दत्तनगर रामनगर पिंपरी 2))केशव उर्फ ओम किशोर अंलकार वय 18 वर्ष, रा. सचिन टेलर्स जवळ, दत्तनगर ,पिंपरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल फोनवर संभाषण करीत असताना काही चोरटे या नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावून धूम स्टाईलने पळून जात असल्या बाबत घटना घडत होत्या. अशा प्रकारच्या गुन्हेगारावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ०२च्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू असताना प्रथम मोबाईल फोन स्नॅचिंग होत असलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज ची सातत्याने तपासणी सुरू केली. हे चोरटे निर्जल स्थळी मोबाईल फोनवरून संभाषण करीत पायी जाणाऱ्या नागरिकांना पाठीमागून येऊन मोबाईल फोन हिसकावून दुचाकीवरून धूम ठोकत असल्याने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांच्या वाहनांचा नंबर वर्णन मिळून येत नव्हते .त्यामुळे बातमीदार व खबऱ्या मार्फत माहिती गोळा करण्याचे सातत्याने काम पथकाने सुरू ठेवले. तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांना माहिती मिळाली की तीन इसम हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (एम एच १४बी डब्ल्यू ७०५३)घेऊन संभाजीनगर येथे मोबाईल विकायचे आहे ,असे सांगत फिरत आहेत .मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ०२चे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.
संभाजीनगर येथील रोटरी क्लब चौकात सापळा लावून त्यातील संशयित इसमांना शिताफीने पथकाने ताब्यात घेतले यामध्ये एक विधी संघर्ष बालक आहे. ताब्यात घेतलेल्या इसमाकडे सखोल तपास केला असता त्यांनी चिखली, दिघी व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दुचाकीवरून फिरून नागरिकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
सदर इसमांकडून एकूण ०६ अँड्रॉइड मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ०१ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्यांच्याकडून चिखली, दिघी अशा पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेले ०३ गुन्हे उघडगीस आणले आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने आणि गुन्हे शाखा युनिट ०२चे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

