अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतातील पिकांची नासाडी होत असते. शेतकऱ्याच्या तोंडाजवळ आलेला घास या वन्य प्राण्यांकडून हिरावला जातो. या वन्यप्राण्याना मारणे कायद्याने गुन्हा आहे. पण शेत मालाच्या पिकाचे सरक्षण व्हावे म्हणून डॉ. श्यामप्रसाद मुखजी जनवनविकास योजनेतर्गत गावातील शेतकरी लाभार्थ्यांना सोलर झटक मिशन शासनाच्या वतीने देण्यात येत असते.
आर्वी तालुक्यातील पिपंळखुटा नजिकच्या दानापूर गावातील शेतकऱ्यांना वन्याप्रण्यापासून शेतीपिकाचे सरक्षण करण्यासाठी तसेच वनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने वनविभाग वर्धा वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या वतीने डॉ. श्याम प्रसाद मुखजी जनवनविकास योजने अंतर्गत गावातील शेतकरी लाभार्थ्यांना सोलर झटक मिशन तसेच गँस कनेक्शनाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमला आर्वीचे वनपरीक्षेत्रा अधिकारी नितीन जाधव याच्या मार्गदर्शनात पिपंळखुटा येथेल क्षेत्र साहाय्यक एस डी भेंडे मनावर फ़ॉरेस्ट गार्ड तसेच दानापूर येथील समीतीचे अध्यक्ष विशल कालोकार, सरपंच सविता कालोकार, सचिव सचिन भालेराव तसेच नागरिकांची उपस्थितीती होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

