अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील शिराळा ते चिंचोली काळे गावातील रस्तावरील जे दोन नाले आहेत. त्यांचे बांधकाम अजूनही अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यात मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणि प्रशासन झोपेसे सोंग घेवून झोपलेले आहे.
संभाजी ब्रिगेड चिंचोली काळे यांनी वारंवार निवेदन दिल्यामुळे शिराळा ते चिंचोली काळे गावातील रस्ता तिन वर्षापूर्वी बनविण्यात आला. मात्र या मार्गावर जे दोन नाले आहेत. त्यांचे बांधकाम अजूनही अपूर्णच आहे. गावकरी लोकांनी या संदर्भात कंत्राटदार रोहित देशमुख यांना फोन करून विचारले असता तो आज करतो उद्या करतो अशीच उडवा उडविची उत्तरे देऊन मोकळा होतो. या दोन्हीं नाल्यावरून त्या भागातील शेतीचे पाणी वाहत जाते त्यामुळे पुल, रस्ता की खड्डा हेच प्रवाश्यांना समजत नाही. पावसाळ्याचे दिवस सुरु आहे त्यामुळे कोणाची तबीयत जास्त बिघडली तर ते वेळेवर पोहचेल की नाही हे सांगता येत नाही तसेच ॲक्स्सिडंट होण्याची भिती जास्त आहे.
याच मार्गावरून दररोज शेकडो नागरिक सोफिया प्लांट मध्ये कामाकरीता रात्री ये जा करत असतात. त्यामुळे पाऊस जर जास्त झाला तर त्यांना गावात यायला दुसरा मार्ग नाही. एक नाल्याचे काम अर्धवट सोडून दिले आहे.या दोन्हीं नाल्यावरील पुलाची पुर्ण दुर्दशा झाली आहे. जर काही जीवितहानी झाली तर याची जबाबदारी कंत्राटदार व प्रशासकीय अधिकारी घेणार का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडतो आहे. विशेष म्हणजे मा. माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू याचं मार्गाने आपल्या गावी जातात. तरी पण या पुलाकडे दुर्लक्ष केल्या जाते. याचे आश्चर्य वाटते.अशी खंत संभाजी ब्रिगेड चिंचोली काळे व गावकऱ्यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

