छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर:- राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बलात्काराच्या घटना, धमकी प्रकरण, लैंगिक अत्याचार, मारहाण, फसवणूक अशा सर्व घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र याकडे सरकार बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाटत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम भावाने आपल्याच बहिणींवर बलात्कार करून बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सख्या भावाने आपल्या बहिणीवर अत्याचार केल्याची यानंतर सदर आरोपी भावावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर हादरून गेले आहे.
गेल्या 2022 मध्ये पीडित मुलीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवताना आपल्या सख्या मावस भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा जबाब दिला होता. यानंतर संशयीत आरोपी भावाला पोलिसांनी अटक केले होते. तसेच त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र ज्यावेळी या घटनेची याचिका न्यायालय दाखल झाली तेव्हा आरोप सिद्ध होत नसल्यामुळे संशयित भावाला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
पुढे या घटनेला 1 वर्षे उलटून गेल्यानंतर 24 मार्च 2023 रोजी पीडित मुलीने पुरवणी जबाबात आपल्या सख्याच भावाने आपल्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे कबूल केले. नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये पीडितेचा भाऊ घरी आला होता. यावेळेस त्याने सख्या बहिणीसोबत लैंगिक संबंध ठेवले. तसेच ही बाब कोणाला न सांगण्याची देखील तिला भीती दाखवली. परंतु पीडित बहिण गर्भवती राहिल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर डीएनए चाचणी आली असून यामध्ये सख्या भावाकडून बहीण गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता पोलिसांनी या नराधम भावावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

