मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नई दिल्ली:- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त अविकसित आकांशीत जिल्हा, म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात हिरा, पन्ना, सोना, मॅग्नेट, लोहा मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्याचबरोबर मोठ मोठे उद्योगधंदे, कारखाने नाही. उद्योग विरहित जिल्हा आहे. जिल्ह्याचा सार्वभौम भौगोलिक विकास नसल्याने मोठ्या प्रमाणे बेरोजगारी सुद्धा आहे.
गडचिरोली जिल्हा जंगला संपदेने नटलेला असल्यामुळे येतील रस्ते, रोडलाईन, रेल्वे या संबंधित अनेक समस्या येत असतात, गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षलग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये भौगोलिक सोयी सुविधा चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात निधि उपलब्ध करावा. जेणेकरून या क्षेत्राचं नक्की यांचा फायदा होईल. असा विश्वास गडचिरोली लोकसभेचे खासदार अशोक नेते यांनी व्यक्त करत त्याचप्रमाणे जिल्हातील रेल्वे लाईन ही वडसा (देसाईगंज) येथे एकमेव असुन वडसा (देसाईगंज) गडचिरोली हा रेल्वे मार्ग तिनशे बाविस कोटीचा सर्वे टेंडर झालेला आहे. लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार तसेच या रेल्वे मार्गाच्या उदघाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा गडचिरोली ला येणार अशी माहिती समोर आली आहे.
याबरोबरच गडचिरोली जिल्हातील वैनगंगा नदिच्या तिरावर एकुण पाच बँरेजेस मंजूर झाले आहेत. त्यापैकी चिचडोह यांचे काम पुर्ण झाले असुन कोटगल बँरेजेसचे काम चालू आहे. तिन बँरेजेसचे काम लवकरच चालू होणार, कोनसरी प्रोजेक्ट व बँरेजेसच्या हया हि उदघाटनाला यावे यासंबंधित खासदार अशोक नेते यांनी येण्याची विनंती केली आहे.
गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रांतील तसेच गडचिरोली जिल्हाच्या विविध क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्याशी भेटी दरम्यान खासदार अशोक नेते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

