रत्नु कांबळे, कोकण ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंधुदुर्ग:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील देवगड मधील नारींग्रे बावकरवाडी येथील तरुणाचा मृतदेह शेत मांगराच्या जवळ असलेल्या ओहोळात आढळून आल्याने एक खळबळजनक माजली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मंगेश शांताराम शिंदे वय 45 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मंगेश शांताराम शिंदे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत देवगड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा घातपात आहे आत्महत्या आहे याचा शोध पोलीस घेत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगेश हा नेहमी नारींग्रे सडा गायगोठण येथे असलेल्या त्यांच्या शेतमांगरात रात्री झोपायला जात होता. सोमवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे ते शेतमांगरामध्ये झोपण्यास गेले होते. त्यांचे वडील शांताराम बापू शिंदे हे मंगळवारी सकाळी ७ वा. सुमारास शेतमांगराकडे मुलासाठी चहा व नाष्टा घेवून गेले. यावेळी तो शेतमांगरात दिसला नाही म्हणून मांगराजवळ असलेल्या वहाळाकडे गेला असेल म्हणून पाहण्यास गेले यावेळी वहाळाच्या पाण्यात त्यांना मृतावस्थेत दिसला. त्यांनी याबाबत तात्काळ गावातील ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. मंगेश हा अविवाहित होता. या घटनेची खबर शांताराम शिंदे यांनी देवगड पोलिस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

