मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सवित्रिच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मणिपूर येथे महिलावर झालेल्या संतापजनक अत्याचाराचा निषेध करून नराधमावर कारवाई करण्यासाठी हिंगणघाट येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मणिपूर येथील हिंसाचाराच्या विरोधात दिनांक 25 जुलै रोजी येथील सवित्रिच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लक्षणिय आंदोलन करण्यात आले. मणिपूर येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार वेदनादायी आहे. याची कोणीही दखल घेतली जात नाही, हे अधिक वेदनादायी आहे, अशी खंत यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली. घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य व केंद्राचा निषेध करण्यात आला. नराधमाना फाशी देण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली. मणिपूर भारतात नाही का? तरी सरकार गप्प का? सरकारचा बेटी बचाव देश बचाव, नारा फक्त मुखात असून ते वास्तविकतेत दिसून येते नाही.
मनिपूरने या स्त्रीवरील अत्याचाराबद्दल राग व्यक्त केला. ही घटना देशासाठी लज्जास्पद आहे. दोन महिन्यांनंतर, ही घटना व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आली. तोपर्यंत प्रशासन सरकार काय करीत होते? महिला सहिष्णुता हाताळण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. पण ते उघड्या डोळ्यांनी बघत आहे. कायदा प्रणाली, प्रशासकीय प्रणाली आणि अंमलबजावणी करणारे लोक त्यांच्या कर्तव्यावर कार्य करत असल्याचे दिसत नाही. सवित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. या घटनेत दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षेची मागणी केली गेली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सीमा आर. मेश्राम सवित्रिच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट हिंगनघाटच्या अध्यक्षा यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी उपाध्यक्षा निर्मला भोंगाडे, सचिव राजश्री बांबोळे, कोषाध्यक्ष योजना वासेकर, सदस्य सिंधू दखणे, नंदिनी मांडवे, प्रमोदिनी नगराळे, सिमा भालशंकर, अनिता साखरे, शितल शंभरकर, रुपा झीलटे, जोशना रामटेके, नुतन धाबर्डे, ज्योतना महेशकर, छबुताई बागडे, शुद्धोमती नाईक, सुषमा पाटिल, नेहा गेडाम, ऋतू कांबळे, तेजस्वीनी पाटील, संगीता खेळकर, लता साखरकर, सुष्मा जनबंधू, कोचन खोडे, कल्पना वागदे, संजिवनी साखरकर, सिमा मानकर, किरण तेलंग, तृप्ती गायकवाड, प्रशंशा नगराळे, लिला थुल, अर्चना गेडाम, रेखा थुल, जया पोथारे मिरा वाघमारे, संगिता लभाने पुजा वानखेड, सरिता वासनिक, सविता गायमुखे, जयश्री देवगडे, भाग्यश्री नगराळे, शालु दुरबुडे, बबिता ठेपे, सविता झीलटे, रूपमाला बानमारे, भारती वैद्य, मीरा फुलमाळी, शारदा डोये, मनिषा महेस्कर, प्रमिला कुंभारे, रेखा मुन, अस्मीता भगत, लिना नगराळे सह शेकडो महिला उपस्थित होत्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

