मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई 25 जुलै:- वर्धा जिल्हात होत असलेले शासकिय मेडिकल काँलेज हिगणघाटला स्थापित होण्या करीता मागील अनेक महिन्यांपासून जनआंदोलन करण्यात येत आहे. पण सरकारच उदासीन धोरण आणि लोकप्रतिनिधींचा हेकेखोरपणा दिवसाने दिवस हिंगणघाट तालुक्यातील नागरिकात असंतोष पसरला आहे. मागील अनेक महिन्यां पासून सुरू असलेल्या आंदोलनाची शासन आणि लोकप्रनिधींनी यांनी साधी दाखल घेतली नाही त्यामुळे हे आंदोलन अती तीव्र करण्यात येत आहे. याच धर्तीवर मुंबईच्या आझाद मैदानावर शासकिय मेडिकल काँलेज संघर्ष समीतीच्या वतीने आंदोलन सुरु केलं
शासकिय मेडिकल काँलेज संघर्ष समीती ने मुंबईच्या आझाद मैदानावर दुसर्या दिवशी सुध्दा भर पाण्यात धरणे आंदोलन सुरु आहे. आज संघर्ष समीतीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेवजी पडवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले, भारतीय रार्ष्ट्रीय काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा प्रभारी प्रविनभाऊ उपासे, शिवसेनीचे जिल्हा उपप्रमुख राजुभाऊ खुपसरे, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, समाज सेवक शामभाऊ इडपवार, प्रशांत भेदुरकर, सुरेंन्द्र बोरकर, प्रलयभाऊ तेलंग, सुधाकर बंगाले, श्रीराम येळणे, हर्षल गुंडे उपस्थीत होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

