सीमा सुरूशे वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्ह्यात अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे वाशिम जिल्हातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात आपणच निवडून दिलेले लोकप्रिनिधींनीही आपल्या व्यथा सरकार आणि प्रशासना समोर मांडत नसेल तर ते काय कामाचे असे प्रश्न शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाले आहे. त्यामुळे या लोकप्रतिनधीं विरूध्द मोठ्या प्रमाणात संताप दिसून येते आहे.19 ते 23 जुलैचा सुमारास वाशिम जिल्हात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी जमा झाले. त्यामुळे सोयाबीन, तुर, सरकी पिकांसह अंदाजे 29 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झालीत. शेकडीच्या वर घरांचे नुकसान झाले.
मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेलोर गावात पाणी शिरले. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, कोणताही लोकप्रतिनिधी गावात फिरकला नसल्याने शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकप्रतिनिधींना गावात ‘नो एंट्री’चे फलक लावून शेतकऱ्यांकडून निषेध केला जात आहे.
वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आणि मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार बैठकीत उपस्थित नसल्याने शेतकऱ्याच्या व्यथा मांडणार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच पाऊस लांबल्याने शेतातील पेरण्या लंबल्या होत्या. त्यात उशिरा पेरण्या झाल्या परंतु जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजविला. तीन दिवस मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली.
या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्याला बसला.१९ जुलै रोजी १२ मंडळातील ५२ गावे प्रभावित झाली. २२ जुलै रोजी ५ मंडळातील ५७ गावे प्रभावित झाली तर २३ जुलै रोजी मानोरा व मंगरूळपीर अनुक्रमे ७८ व १८ गावे प्रभावित झाली. मोठ्या प्रमाणावर पिके खरडून गेली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. जनावरे दगावली, जीवित हानी झाली. अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार मात्र उपस्थित नसल्याने शेतकऱ्याच्या व्यथा कोण मांडणार,असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

