✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये सतत अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे हिंगणघाट तालुक्यातील गावांमधून वर्धा नदी, वना नदी, यशोदा नदी व मोठे मोठे नाले असल्यामुळे धरणाचे व कालव्याचे पाणी ओसंडून वाहत आहे. त्यात सतत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसामुळे संपूर्ण पिके नष्ट झालेली आहेत तसेच शेतकऱ्यांचे बांध सुद्धा वाहून गेलेले आहेत त्यामुळे शासन स्तरावर तलाठी कृषी सहाय्य ग्रामसेवक यांना आदेश देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचग तात्काळ करावे आतापर्यंत शासन स्तरावर पंचनामे झालेले नाही ही हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण गावात जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी केली आहे.
मागील वर्षी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस आपण त्यावेळेस विरोधी पक्षनेता होते त्यावेळेस आपण हिंगणघाट तालुक्यातील पुरग्रस्त भागाचे प्रत्यक्ष पाहणी केली होती त्यामुळे आपल्याला हिंगणघाट तालुक्यातील परस्थिती माहिती आहे कारण आपण शासन स्तरावर आदेश देऊन शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांची पाठीशी उभे राहावे व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसाना ची भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री विनोदराव वानखेडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट यांच्या वतीने मा. तहसीलदार हिंगणघाट यांच्या मार्फत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना करण्यात आली.
यावेळी निवेदन देतांना उपस्थित हरीश वडतकर कृ.उ.बा.स हिंगणघाट सुरेश संतोकर, संचालक कृ.उ.बा.स. हिंगणघाट, सौं कविता विनोद वानखेडे सरपंच ग्रामपंचायत वडनेर, प्रवीण कलोडे उपसरपंच ग्रामपंचायत टेंभा, सुशील वरुडकर माजी पंचायत समिती सदस्य फुकटा, शरद कुरसंगे उपाध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रमोद वरभे टेंभा अनंत बोरेकर फुकटा, गजानन तडस टेंभा, आशिष ढगे हिंगणघाट तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मोहन लोहकरे वडनेर, दीपक ढगे टेभा, रितेश तडस टेभा इत्यादी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

