पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास एक इसम नामे रमेश रुपचंद जैन, वय 57 वर्ष, व्यवसाय चांदीचे व्यापारी, राह. कुशल अपार्टमेंट, फ्लॅट नं. 203, शाहू उद्यानच्या समोर, सोमवार पेठ, पुणे यांनी समक्ष पोलीस ठाणे, पुणे शहर येथे येवून माहिती दिली की, ते आज रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास शाहू उद्यान ते पुणे स्टेशन असा रिक्षाने प्रवास करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन येथे रिक्षाचे भाडे देताना त्याच्या जवळ असलेली अडीच किलो वजनाची विविध प्रकारचे दागिन्याची बॅग अंदाजित किंमत. 2 लाख रुपये ही रिक्षामध्ये विसरले. त्यानंतर सदरची चांदीच्या दागिन्याची बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे त्याचे लक्षात आले असता ते पोलीस ठाणे येवून सदरबाबत माहिती दिली असता सदर रिक्षाचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोना रहीम मुसा शेख यांनी समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील शाहू उद्यान समोरील सीसीटिव्ही कॅमेरे चेक करुन कौशल्यपुर्वक रिक्षा क्र. एमएच 12 क्यू ई 6875 प्राप्त केला. सदर प्राप्त केलेले रिक्षा क्रमांकाची नाकाबंदी ॲपव्दारे त्याची डिटेल प्राप्त करुन सदर रिक्षाचा मालक नामे राहूल वाघमारे रा. कस्तूरबा गांधी, गणेशखिंड रोड, औंध येथे सपोफौज दत्तात्रय मानसिंग भोसले व पोहवा प्रमोद बाळासाहेब जगताप यांनी सदर पत्त्यावर जावून समक्ष माहिती घेतली असता सदरची रिक्षा ही बजाज फायनान्स कंपनीने ताब्यात घेवून नानापेठ, पुणे येथील इसमास विकली असल्याबाबत माहिती मिळाली.
त्यानंतर सदर रिक्षाचे वाहतूक विभागा कडून सदर रिक्षावर असलेले चलनाची माहिती घेवून त्यावरुन रिक्षा चालकाचा फोटो व त्याचे परमिटची माहिती घेवून रिक्षाचा शोध घेण्यात आला असता सदरची रिक्षा ही हडपसर येथे भाडे घेवून गेली होती सदर रिक्षावरील चालक नामे दिगंबर सतिष जाधव वय 22 वर्ष राह. अनुसया बिल्डींग, त्रिभृती चौक, कात्रज, पुणे यास फोन करुन त्यास पोलीस ठाणे येथे बोलावुन घेवुन त्याचेकडे रिक्षामध्ये विसरलेले बॅगबाबत चौकशी केली असता, सायंकाळी 5 वाजता रात्र पाळीकरीता चालविण्या करीता त्याचा नातेवाईक नामे आर्यन उध्दव माने यास दिल्याचे त्यांने सांगितले. त्यानंतर सदर रिक्षामध्ये विसरलेल्या चांदीच्या दागिन्याचे बॅग बाबत दिंगबर जाधव यांने आर्यन माने याचेकडे फोनव्दारे चौकशी केली असता, आर्यन माने यास रिक्षामध्ये एक लाल रंगाची बॅग मिळाल्याचे सांगितले त्यास सदरची बॅग पोलीस ठाणे येथे जमा करण्यास सांगितली असता सदर बॅग सह तो पोलीस ठाणे येथे 10 वाजता हजर झाला त्याने त्यास मिळालेली चांदीचे दागिन्याची बॅग पोलीस ठाणे येथे दिल्याने दागिन्याचे मालक रमेश जैन यांनी सदर दागिन्याची खात्री केली असता सर्व दागिने सुस्थितीत मिळून आले असुन ते त्याचे मुळमालक रमेश जैन यांना सुर्पत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सपोफौज/दत्तात्रय मानसिंग भोसले व पोहवा प्रमोद बाळासाहेब जगताप पोहवा रोहिदास जवाहर वाघेरे पोना रहीम मुसा शेख यांनी केली आहे.

