पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ
महाराष्ट्र संदेश न्यूज !ऑनलाईन पुणे:- पावसाळा उशिरा आल्याने तसेच धरणामध्ये मुबलक पाण्याचा साठा नसल्यामुळे पाण्याची परिस्थिती पाहता पुणे महानगरपालिका मार्फत पाणी कपात म्हणून दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच पुणे शहराचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस शेर आली शेख यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त साहेब पुणे महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पावसाळा उशिरा आल्याने तसेच धरणामध्ये मुबलक पाण्याचासाठ नसल्यामुळे पाण्याची परिस्थिती पाहता पुणे महानगरपालिका मार्फत पाणी कपात म्हणून दर गुरुवारी पुणे शहराचे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती आपल्या मनपाच्या संकेतस्थळावरून मिळाली. परंतु सध्या झालेल्या चांगल्या पावसामुळे वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमलेला आहे, अशी माहिती विविध माध्यमातून मिळाली. दर गुरुवारी पाणी कपातीमुळे नागरिकांना त्रासाला समोर जावे लागत आहे. लोकांना पाण्याची अत्यंत गरज असते, नागरिकांची गैर होऊ नये, म्हणून आपण अशी मागणी करण्यात येत आहे तसेच धरणामध्ये पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे महानगरपालिके मार्फत घेण्यात आलेला दर गुरुवारी पाणी खपाचा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच पुणे शहरात पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू करण्यात यावा, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

