हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर :- शहरातून एक धक्कादायक घटना घडली असून पेशाने पत्रकार व बल्लारपूर येथील पेपर मिल मध्ये काम करणाऱ्या एका इसमाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे. सुधीर लोखंडे वय 51 वर्ष रा. विद्यानगर वॉर्ड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक पत्रकार सुधीर लोखंडे हे बल्लारपूर येथील पेपर मिल मध्ये मागील 25 वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. मागील काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने 51 वर्षीय लोखंडे यांना कामावरून निलंबित केले होते, त्यांनतर ते मानसिक व आर्थिक स्थितीचा सामना करीत होते. मानसिकरित्या खचल्यावर त्यांनी हे पाऊल उचलले अशी चर्चा आहे. याबाबत बल्लारपूर पोलिसांना माहिती देण्यात आली पुढील तपास पोलीस करत आहे.
लोखंडे कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर.
सुधीर लोखंडे हे पेपर मिल मध्ये काम करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. पण अचानक कंत्राटदाराने मृतक लोखंडे यांना कामावरून निलंबित केले. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून आर्थिक विवचनेत अडकले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्यानी त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. लोखंडे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

