अशोक मेश्राम यांच्या दुःखद निधनाने रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी चळवळीची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही “रिपाइं (ए) वर्धा जिल्हा व विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांची शोक संवेदना “
अर्पित वाहोणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रिपब्लिकन आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक मेश्राम यांचे दुःखद निधन झाल्याने आंबेडकरी चळवळीतील शोककळा पसरली आहे. अशोक मेश्राम सारखे लढाऊ व्यक्तिमत्त्व आज निघून गेल्याने आंबेडकरी चळवळीची न भरून निघणारी हानी झाली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जेष्ठ नेते म्हणुन अशोक मेश्राम सर्वाना परिचित होते. त्यांनी दलीत पँथर चळवळीत कार्य केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मध्ये आंबेडकरी व बहुजन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सामाजिक व राजकीय कार्य करत ते जिवन जगले. दिवंगत अशोक भाऊ यांनी आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. ते कुशल व प्रगल्भ कार्यकर्ता म्हणून ते शोषित, पिडीत व बहुजनांच्या न्याय हक्कासाठी शासना विरोधात बंड करणारे रिपाइं नेते होते.मात्र त्यांचे हृदयविकाराने मृत्यु झाल्याने तीव्र दुःख होत आहे. त्यांच्या मृत्यू ने रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी चळवळीची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही; अशी शोक संवेदना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी व्यक्त करून त्यांच्या पत्नी सविताताई (घोडे) मेश्राम, मुलगी बेनझीर यांचे सात्वंत केले.

