नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड:- नांदेडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे माकडाने धुमाकूळ घातल्यामुळे एका महिलेवर जीवघेणा प्रसंग ओढावला होता. एक महिला गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. विहिरीतून पाणी काढत असताना पाठीमागून आलेल्या माकडाने त्या महिलेला विहिरीत ढकलून दिलं. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगावमध्ये घडली
एका महिलेला धुमाकूळ घातलेल्या माकडाने खोल विहिरीत फेकल्याने सर्विकडे एकच खळबळ माजली होती. विहीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात ही घटना आली त्यांनी ओरड करून विहिरीत पडलेल्या या महिलेला बाहेर काढत तिचा जीव अगदी थोडक्यात वाचवला. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. घाबरगुंडी उडालेल्या या महिलेला लोकांनी लगेचच दवाखान्यात नेलं. तिथे या महिलेवर उपचार करण्यात आले होते. या महिलेला किरकोळ दुखापत झाल्यानं माकडाचा धक्का अगदी थोडक्यात निभावला, अशी भावना गावातील लोकांनी व्यक्त केलीय. दरम्यान, या घटनेला गावातील लोकांनी वनविभागाला जबाबदार धरलंय.