रत्नु कांबळे, सिंधुदुर्ग ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंधुदुर्ग:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बाजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी अक्षया पावसकर यांचा रूग्णालयात कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. पावसकर रूग्णालयात अचानक खाली पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जिल्हातील आरोग्य प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
वैद्यकीय अधिकारी अक्षया पावसक 38 वर्षांच्या होत्या. त्या मागील काही वर्षांपासून आरोग्य उत्तमरित्या आरोग्य सेवा बजावत असताना या तरूण वैद्यकीय अधिकाऱ्याचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अक्षया पावसकर रूग्णालयात कर्तव्य बजावत असताना, त्या अचनाक कोसळल्या. दरम्यान, याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. अक्षया यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, शवविच्छेदनानंतर नक्की कारण समोर येईल असे सांगितले जात आहे.मृत्यूच्या कारणाचा शोध घेणार..राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, महिला डॉक्टरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा देखील विभागामार्फत शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करोना महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कामगारांनी रुग्णांना जीवदान देण्यासाठी केलेले अथक प्रयत्न अविस्मरणीय आहेत. म्हणूनच अनेकांचे प्राण वाचले. करोना योद्धे डॉक्टरांचे समाजावर मोठे ऋण आहे. असाच एक योद्धा म्हणजे शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अक्षया पावसकर होत्या. त्या मूळच्या शांतीनगर, फोंडा येथील रहिवासी होत्या. आरोग्य केंद्रातील कामामुळे लोकप्रिय होत्या. कोविडच्या काळात त्यांना आरोग्य खात्याने विशेष जबाबदारी दिली होती.
डॉक्टरी पेशाबरोबर रचल्या कविता… रुग्णांचे आजार बरे करण्याबरोबरच त्या काव्यातून रसिकांच्या मनालाही उत्साह प्रदान करायच्या. त्या चांगल्या कवयित्रीदेखील होत्या. त्यांच्या कविता टिप्टन पोएट्री जर्नल, शार्ड्स, द ब्लू निब, नॉर्थ ऑफ ऑक्सफर्ड, इंडियन रुमिनेशन, रॉक अँड स्लिंग, आणि इतर अनेकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी २०२० मध्ये क्रेव्हन आर्ट्स कौन्सिल एक फ्रॅस्टिक कविता स्पर्धा जिंकली आणि २०१८ मध्ये द ब्लू निब चॅपबुक स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांनी कवितेची दोन पुस्तके तसेच ‘द फॉलिंग इन आणि द फॉलिंग आउट’ आणि कॉकटेल अशी दोन पुस्तकेही लिहिली आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

