नितेश पत्रकार, वणी तालुका प्रतिनिधी
मो.नं.76200299220
यवतमाळ, वणी:- दी 30 ऑगस्ट मोहंदा येथिल गिट्टी क्रेशर प्लांटवर करंट लागुन निलेश विठ्ठल भोस्कर वय 27 वर्ष रा,मोहंदा याचा या आपघातात मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त, निलेश उर्फ महांकाली भोस्कर ते दरोरोजच्या प्रमाणे तो गिट्टी क्रेशर प्लांटवर आपली डयुटी असल्यामुळे तो जात असायचा. जवळपास 2 ते 3 वर्ष कंपनी मध्ये तो कार्यरत होता, त्याची डयुटी 11 ते 2 असायची, तो ब्लास्टिंग या पोस्टिंग वर होता, निलेश आपली डयुटी बजावत असता वेळेस जवळपास ½ ते २ या दरम्यान निलेशला करंट लागला व तो तिथेच पडला त्या नंतर प्लांटवर जे डयुटी बजावत होते त्यांनी तात्काळ गाडी बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले व डॉक्टरांनी तपासणी केली व डॉक्टरांनीं मृत्य घोषित केले.
या युवकाला मृत घोषित केल्या नंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदना करिता पाठवण्यात आले होते. ते करून निलेशचे पार्थवशरीर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले., पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे. निलेश हा घरचा कर्ता पुरुष असल्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाच डोंगर कोसळला आहे. निलेशच्या मागे आई लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.