वेकोलि कामगार सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात विध्यार्थीकरिता कंपास तर नेफडो संस्थेला दिल्या कुंड्या भेट.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांनी अत्यंत परिश्रमाने कोळसा उत्खननात महत्वपूर्ण भूमिका बजावत ऊर्जा निर्मिती क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. आपल्या परिश्रमाने कामा सोबतच पारिवारिक जबाबदारी सांभाळून सेवानिवृत्त होणे हा अविस्मरणीय क्षण असून आता सामाजिक बांधीलकी जोपासत मिळालेल्या आर्थिक मोबदल्याचे योग्य नियोजन करावे असे प्रतिपादन अध्यक्षस्थाना वरून तरुण देवडा, खान प्रबंधक यांनी बोलतांना केले.
वेकोलिच्या धोपटाळा ओसी /सास्ती यु जी टू ओ सी माईन मधे सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्ह्णून के.के. राय, सुरक्षा अधिकारी, अशोक सिंग, व्यवस्थापक, टी. धारणे, अभियंता, सेवानिवृत्त कर्मचारी नवनाथ वैरागडे, कलवलकुमार, नवनाथ डाहुले, शेषराव निमकर, भाऊराव जेनेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सेवानिवृत्त कामगार नवनाथ वैरागडे यांनी सेवानिवृत्ती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील विध्यार्थीना कंपास बॉक्स भेट सहायक शिक्षक मोहनदास मेश्राम यांच्या मार्फत देण्यात आले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चे नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर यांच्या मार्फत नेफडो संस्थेला कुंड्या भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. वासनिक यांनी केले.दि. 31 ऑगस्ट ला या पाच कामगार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सर्व सेवानिवृत्त कामगारांचा शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सय्यद शहजाद अली, होमदेव चन्ने, रावला रामस्वामी, रामाजी घटे, प्रवीण वैरागडे (मुलगा), अस्विनी वैरागडे (सुन), रमेश इटनकर, शारदा इटनकर, बादल बेले, सुवर्णा बेले यांचेसह आप्तस्विकीय, मित्र परिवार अन्य कर्मचारी उपस्थित होते.

