गुरुवारी शहरात शिवप्रहार प्रतिष्ठानसह हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा
🖊️ विश्वास त्रिभुवन,अहमदनगर जिल्हा प्रतनिधी
श्रीरामपूर:- शहरात एक तरुणी 40 दिवसांपासून बेपत्ता आहे. तिचा तपास लागला नाही. हा ‘लव जिहाद’चाच प्रकार असल्याने या प्रकरणाचा तपास करून आरोपीला शोधून त्याच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी काल गुरुवारी शहरात शिवप्रहार प्रतिष्ठानसह हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. येत्या 4 दिवसांत या आरोपीचा तपास न लागल्यास शहरातील व्यापार्यांशी चर्चा करून श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलिस अधिकारी सूरजभाई आगे यांनी दिला आहे.
एका कॉलेज तरुण मुलीला मुस्लिम समाजाच्या एका तरुणाने पळवून नेले, परंतू पोलिस ठाण्यात याबाबत फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार हा लव जिहादचा असल्याने कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी अनेकदा निवेदने दिली, परंतू मुलीचा तपास न लागल्याने आज याप्रकरणी शिवप्रहार प्रतिष्ठान व समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तरुण सहभागी झाले. श्रीरामपुरात लव जिहादचे प्रकार वाढत आहेत. याला वेळीच आळा घालण्यास पोलिसांने कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे आगे म्हणाले. पो. नि. हर्षवर्धन गवळी, सपोनि. बोर्से यांनी निवेदन घेतले.
उर्वरित आरोपींना लवकरच गजाआड करू !
मुल्ला कटर प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरच गजाआड करु. या प्रकरणात कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक बाळासाहेब शेखर यांनी श्रीरामपूर भेटीत दिला.

