मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करत असतात. आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञान-निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, साहस, सहकार्य, समाजाभिमुखता या गुणांनी युक्त व्यक्तिमत्त्वाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे. अशी व्यक्तिमत्वे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. असे विचार प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे संचालक रमेशराव टपाले यानी व्यक्त केले ते हिगंणघाट येथील भारत विघालयात देशाचे दिवगंत राष्टपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण्न यांच्या जन्म् दिना निमित्य आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर मुख्याध्यापक राजु कारवटकर, उपमुख्याध्यापक हरिष भटटड, पर्यवेक्षिका प्रतिभा शंभळकर, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2023 चे गुणवंत विद्यार्थी अक्षदा आंबटकर, अजय येलके, शंकरराव इटनकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अक्षदा आंबटकर, अजय येलके, शंकरराव इटनकर यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिक्षक डॉ.विनोद डोमकावळे म्हणाले की, चांगला शिक्षक हा समाज व राष्ट्र घडवू शकतो. परंतु आज शिक्षकाकडे शैक्षणिक कार्यपेक्षा अशैक्षणिक कामेच जास्त आहे त्यामुळे अध्यापन कार्यात अडथळा निर्माण होतो.
अवेळी गुणवंत विद्यार्थी अक्षदा आंबटकर, अजय येलके यानी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजु कारवटकर करताना म्हणाले की शिक्षण क्षेत्रात अधिकाअधिक विकसित व्हावा चांगल्या शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे. याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करता यावा म्हणून सर्व शिक्षकानां व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला पुष्पगुच्छ दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना सुरपाम यानी तर आभार उपमुख्याध्यापक हरिष भटटड यानी केले.

