पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील प्रसिद्ध हल्दीराम हॉटेल मधील मिठाई मध्ये अळ्या मिळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. हल्दीराम हॉटेल प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे यातून दिसून येत आहे.
एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्तीने नागपुर शहरातील हल्दीराम हॉटेल यांच्या इतवारी आउटलेट मधून खरेदी करण्यात आलेल्या एका मिठाई मध्ये (फंगस) व अळ्या दिसून येत आहे. त्यात हॉटेल मध्ये मिठाई घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी ती मिठाई हातानी तोडली असता त्यात मोठ्या प्रमाणात अळ्या दिसून येत होत्या.
नागपुर शहरातील प्रसिद्ध हल्दीराम हॉटेल मधील मिठाई मध्ये अळ्या मिळून आल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे.
महाराष्ट्र संदेश न्युज या व्हिडिओची पुष्टी करत नाही..
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

