संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मार्कंडा देव दिनांक ६:- रोजी मार्कंडा देव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून श्री चंदुभाऊ मरसर्कोल्हे हे होते तर उद्घाटक म्हणून श्री पंचपू लिवार सर केंद्र प्रमुख केंद्र भेंडाला हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून निलेश खोब्रागडे सर व शिक्षण विस्तार अधिकारी श्री टेभूर्णे सर प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेला असंख्य पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री धनराज वासेकर, कीर्ती आत्राम, दुर्गा वासेकर, शामराव राऊत, सुशील शेंडे, इंदुताई बरसगडे उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या परिषदेत फुलोरा उपक्रम, विद्या प्रवेश, सेतू उपक्रम, निपुण भारत अभियान, शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा, अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या शिक्षण परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर केंद्रे यांनी सुनियोजित केले व संचालन टेंभूर्ने सर तर आभार उईके सर यांनी केले व सायंकाळी 5.00 वाजताच्या दरम्यान सर्वासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भोजनाच्या आस्वाद घेतला नंतर या परिषदेची सांगता करण्यात आली. यावेळी सर्वांनी आयोजकांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

