मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील बामणी येथील सुशीला मारा मडे यांचा नुकतेच 6 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.याची माहिती मिळताच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी बामणी गाठून मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन आस्थेने विचारपूस केले.
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य समय्या कुळमेथे यांच्या संबंधातील मारा मडे यांची पत्नी सुशीला यांचे अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले होते.घरची हलाखीची परिस्थिती असल्याची माहिती भाग्यश्री ताईंना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गावात जाऊन मारा मडे व त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आस्थेने विचारपूस करत आर्थिक मदत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंकटलक्ष्मी आरवेली, माजी पंचायत समिती सदस्य समय्या कुळमेथे तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

