डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- शहरासह पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरणारी सराईत दुचाकी चोरटे देहूरोड पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलिसांनी या चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे १० गुन्हे उघड केले आहेत. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे हे चोरटे चोरलेल्या दुचाकी पैसे आणून देतो असे मनी ट्रान्सफर करण्यांना सांगायचे आणि ते चोरलेली दुचाकी तिथेच ठेवून पैसे घेऊन धूम ठोकायचे. अशाच चोरट्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत १) अमृत भाऊसाहेब देशमुख वय ४६ वर्ष रा. कानापूर, सिरसाट ता. धारूर, जि. बीड आणि फारूख शब्बीर शेख वय ३७ वर्ष रा. मोहा रोड, सिरसाळा, ता. परळी, बीड अशी अटक केलेल्या सराईत दुचाकी चोरांची नावे आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी यांनी वाहन चोरीस प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने देहूरोड पोलीस स्टेशन मधील तपास पथकाने दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला. यावेळी या पथकाने दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळ व परिसरातील ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना दोन्ही इसम एक दुचाकी चोरी करून गेल्याचे निष्पन्न झाले. या दोन इसमा बाबत पोलिसांना माहिती घेतली असता हे इसम बीड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
देहूरोड पोलीस पथकाने या दोन इसमाना बीड येथून मोठ्या सीताफिने ताब्यात घेतले. या दोघांना दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीमध्ये रिमांड मिळवला. तपास पथकाने त्यांच्याकडून तपास करून तसेच तांत्रिक तपासाचा आधार घेतला आणि देहूरोड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, औरंगाबाद, घोडेगाव, अहमदनगर येथून त्यांनी चोरी केलेल्या ०८ लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केलेल्या आहेत. चोरी केलेल्या एकूण दुचाकीपैकी ०६ दुचाकी आळंदी, मरकळ रोड ,लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरळी, परिसरातील वेगवेगळ्या मनी ट्रान्सफर सेंटरकडे ठेवून पैसे स्वतःच्या खात्यावर घेतले आणि मनी ट्रान्सफर वाल्याची फसवणूक केली आहे.
यावेळी अटक केलेल्या सराईत चोरट्यांकडून पोलीस ठाणे ०३ गुन्हे आळंदी पोलीस ठाणे ०३, सांगवी, हिंजवडी, क्रांती चौक पोलीस ठाणे (औरंगाबाद शहर) सोनई पोलीस ठाणे (अहमदनगर) प्रत्येकी एक असे मिळून १० गुन्हे देहूरोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने उघडकीस आणले आहेत. चोरीच्या ०१ दुचाकीचा शोध देहूरोड पोलीस घेत आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, देहूरोड पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, उपनिरीक्षक सोहम धोत्रे, पोलीस अमंलदार बाळासाहेब विधाते, सुनील यादव ,किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, निलेश जाधव, युवराज माने, सचिन शेजाळ, स्वप्नील साबळे, संतोषी महाडिक यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445438

